सुमित्रा होंडे मृत्यूप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जानेवारी 2017

अंबड - येथील बाजार समितीचे सभापती सतीश होंडे यांच्या पत्नी व समर्थ कारखान्याच्या संचालिका सुमित्रा होंडे यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता. तीन) संशयितांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला. दरम्यान, विशेष पोलिस महानिरीक्षक अजित पाटील यांनी घटनास्थळी पाहणी केली. 

अंबड-जालना मार्गालगत असलेल्या इंदानी कॉलनीतील घरात सुमित्रा या सोमवारी (ता.2) दुपारी एकट्या होत्या. दुपारी दोनच्या सुमारास डोक्‍याला गंभीर जखम झाल्याच्या स्थितीत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. प्राणघातक हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याची चर्चा सुरू झाली आणि परिसरात खळबळ उडाली. घरात रिव्हॉल्व्हरही आढळे. नेमका प्रकार काय, याबाबत पोलिस तपास करीत होते. जिल्हा पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंग, अपर पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर यांनी काल रात्री अकरा ते साडेअकराच्या दरम्यान घटनास्थळी पाहणी केली. तर आज परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक अजित पाटील यांनी भेट देत तपासाबाबत सूचना केल्या. दरम्यान, पोलिसांनी रिव्हॉल्व्हर जप्त केले आहे. घरात काम करणाऱ्या मोलकरणीची रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात चौकशी करण्यात आली. सुमित्रा यांचे वडील विश्‍वंभर बाबासाहेब तारख (रा. अंतरवाली सराटी) यांच्या फिर्यादीवरून येथील पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पाठीमागच्या बाजूने घरात प्रवेश करीत संशयिताने सुमित्रा यांच्यावर गोळीबार केला असावा, अशीही शक्‍यता व्यक्त होत आहे. हल्लेखोर नेमके किती होते, हल्ल्यामागचे कारण काय आदींचा तपास पोलिस करीत आहेत.

Web Title: sumitra honde murder case

टॅग्स