सावधान, उन्हाळ्याचा कालावधी घटतोय!

आदित्य वाघमारे
शुक्रवार, 4 मे 2018

औरंगाबाद - उन्हाळ्याची चाहूल संक्रांतीला लागते. फेब्रुवारीपासून उन्हाचे चटके बसायला सुरवात होते; मागील पाच वर्षांपासून एप्रिलपर्यंत म्हणावे तसे उन्हाळ्याचे चटके जाणवले नाहीत. त्यामुळे उन्हाळ्याचा १२० दिवसांचा कालावधी घटून सुमारे ९० दिवसांवर आला आहे.

औरंगाबाद - उन्हाळ्याची चाहूल संक्रांतीला लागते. फेब्रुवारीपासून उन्हाचे चटके बसायला सुरवात होते; मागील पाच वर्षांपासून एप्रिलपर्यंत म्हणावे तसे उन्हाळ्याचे चटके जाणवले नाहीत. त्यामुळे उन्हाळ्याचा १२० दिवसांचा कालावधी घटून सुमारे ९० दिवसांवर आला आहे.

मकर संक्रांतीला उत्तरायण सुरू झाले की उन्हाळ्याची चाहूल लागते. ७ मार्चपर्यंत वातावरणातील हा बदल प्रकर्षाने जाणवायला हवा; पण गेल्या पाच वर्षांत असे होताना दिसत नाही. उत्तरायणाला सुरवात जानेवारीच्या मध्यात होत असली तरी त्यानंतर ७ फेब्रुवारीपासून तापमानात वाढ जाणवणे अपेक्षित आहे. ७ फेब्रुवारी ते ७ जूनदरम्यान १२० दिवसांच्या कालावधीत उन्हाळा असायला हवा. ३५ ते ३७ अंशांचे तापमान हे मार्च-फेब्रुवारी महिन्यांत असायला हवे. हे समीकरण आता बदलत असून, त्याचा परिणाम म्हणून उन्हाळ्याच्या अवधी कमी झाला आहे. १२० दिवसांचा उन्हाळा आता सुमारे ९० दिवसांवर आल्याने ऋतुचक्रातही अनिश्‍चितता यायला सुरवात झाली आहे. ही अनिश्‍चितता आगामी काळातही कायम राहून हा कालावधी अधिक कमी होण्याची चिन्हे असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

यंदा एप्रिल महिन्यात गारपीट पाहायला मिळाली. ही गारपीट आगामी दोन वर्षांत मे महिन्यातही पाहायला मिळू शकते. उन्हाळ्याचा कालावधी घटतो आहे. याचा परिणाम ऋतुचक्रावरही पाहायला मिळतो आहे. 
- डॉ. श्रीनिवास औंधकर, संचालक, एमजीएम डॉ. अब्दुल कलाम विज्ञान व अंतराळ संशोधन केंद्र.

यंदा मार्चपर्यंत थंडी 
मार्च महिन्यात तापमान वाढायला हवे; मात्र यंदा तसे झाले नाही. मार्च महिन्यामध्येही सकाळी किमान तापमानातही घट पाहायला मिळाली. ही घट चिंताजनक असून, त्याच्यासह अनेक बदल आपल्याला पाहायला मिळाले. यंदा एप्रिल महिन्यात ढगांचा डेरा नभात पाहायला मिळाला. पाऊस आणि गारपीटही झाली. एप्रिल महिन्यात झालेली गारपीट २०२० पर्यंत मे महिन्यातही पाहायला मिळेल, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. 

Web Title: summer period decrease