वाढत्या उन्हामुळे पोहणार्यांच्या उत्साहालाही उधाण

आष्टी तालुका हा कायमच दुष्काळाचा सामना करणारा तालुका म्हणून ओळखला जातो. ऐन पावसाळ्यात टँकर व छावण्या सुरू करण्याची वेळ कित्येकदा प्रशासनावर आलेली आहे.
Swimming
SwimmingSakal
Summary

आष्टी तालुका हा कायमच दुष्काळाचा सामना करणारा तालुका म्हणून ओळखला जातो. ऐन पावसाळ्यात टँकर व छावण्या सुरू करण्याची वेळ कित्येकदा प्रशासनावर आलेली आहे.

आष्टी (जि. बीड) - उन्हाळा (Summer) म्हटला की महिलांच्या (Women) डोक्यावर हमखास हंडा, लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांचीच दूरवरून पाणी (Water) आणण्याची चाललेली धडपड, काही ठिकाणी टँकरची (Tanker) वाट पाहणारे गावकरी, छावण्या असे चित्र आष्टी तालुक्यात बहुतांश ठिकाणी दिसून येते. परंतु गेल्या दोन-तीन वर्षांपासून पाऊसकाळ चांगला झाल्याने हे चित्र वेगाने पालटले आहे. पाण्याच्या मुबलक उपलब्धतेमुळे अनेक नद्या उन्हाळ्यातही वाहत आहेत. विहिरी, तलावांत चांगले पाणी असल्याने पाणीटंचाईच्या झळा जाणवत नसून, महिला पर्वीप्रमाणे नदीकडेला धुणे धुवायला गर्दी करीत आहेत. वाढत्या उन्हामुळे पोहणार्यांच्या उत्साहालाही उधाण आल्याचे चित्र तालुक्यात पाहायला मिळत आहे.

आष्टी तालुका हा कायमच दुष्काळाचा सामना करणारा तालुका म्हणून ओळखला जातो. ऐन पावसाळ्यात टँकर व छावण्या सुरू करण्याची वेळ कित्येकदा प्रशासनावर आलेली आहे. तालुक्यात अनेक गावांत सलग दीड वर्षे टँकर सुरू राहिलेली गावे आहेत. दिवाळीनंतर प्रशासनास अनेक गावांत टँकर सुरू करण्याचे नियोजन करावे लागते, अशी दुष्काळी स्थिती कायमच तालुक्यात असते.

या पार्श्वभूमीवर गेल्या तीन वर्षांपासून आष्टी तालुक्यात दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. सलग तीन वर्षे चांगला पाऊस झाल्याने टँकर किंवा छावणी सुरू करण्याची वेळ प्रशासनावर आलेली नाही. मागील वर्षी पावसाचा उच्चांक झाल्याने तर यावर्षी अधिक चांगली स्थिती आहे. अनेक नद्या-ओढे उन्हाळ्यातही वाहत आहेत. जलसाठ्यांमध्ये समाधानकारक साठा असून, विहिरी व इतर जलस्त्रोतांमध्ये पाण्याची मुबलक उपलब्धता पाहायला मिळत आहे.

सध्या उन्हाळ्यात अनेक ठिकाणी महिला वर्ग नदीकडेला धुणे धुताना पाहावयास मिळत आहे. वाढत्या उन्हामुळे व नद्या-विहिरींना पाणी असल्याने पोहणार्यांचाही उत्साह पाहायला मिळत असून, पोहण्याचा आनंद बच्चे कंपनीसह मोठेही लुटत आहेत. गेल्या अनेक वर्षांत अपवादानेच दिसणारे हे चित्र आष्टीकरांसाठी सुखद ठरले आहे.

तालुक्यात टँकर सुरू नाही

कोरोनाच्या दोन वर्षांत तालुक्यात टँकर सुरू करण्याची वेळ न आल्याने प्रशासनाचीही डोकेदुखी कमी झाली. मागील दोन वर्षांप्रमाणेच तालुक्यात यंदाही मार्चअखेरपर्यंत एकही टँकर सुरू झालेला नाही. गावात पाणीटंचाईची मागणी असलेला एकही अर्ज पंचायत समितीस प्राप्त झालेला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com