‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’तर्फे शहरात समर यूथ समिट

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 मे 2018

औरंगाबाद - तरुण पिढीला शैक्षणिक, सामाजिक व व्यावसायिक विकासावर लक्ष केंद्रित करताना समाज व देशासाठी रचनात्मक काम उभे करण्यास प्रेरणा मिळावी, यासाठी डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशनच्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ (यिन) या युवा व्यासपीठातर्फे महाविद्यालयीन तरुणाईसाठी ‘यिन समर यूथ समिट’ होणार आहे. औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांसाठी औरंगाबादेत सिडकोतील संत तुकाराम नाट्यगृहात ता. १०, ११ आणि १२ जूनला समिटचे आयोजन करण्यात आले आहे. 

युवकांना उद्योग, राजकारण, टीम बिल्डिंग, स्टार्टअप, खेळ, नवीन तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये यशस्वी ठरलेल्या व्यक्‍तींबरोबर थेट संवाद साधण्याची संधी देताना भविष्यातील शैक्षणिक संधींचा वेध घेणाऱ्या तीन दिवसांच्या ‘यिन समर यूथ समिट’ला ता. १६ मेपासून मुंबईत सुरवात झाली आहे. मुंबईसह कोल्हापूर, सातारा, सोलापूर, पुणे, नागपूर, नाशिक, अकोला, नगर, औरंगाबाद, नांदेड आणि जळगाव येथील दहावीनंतरचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘यिन’ या व्यासपीठाच्या माध्यमातून या परिषदा होत आहेत. राज्यभर होणाऱ्या परिषदांसाठी स्पेक्‍ट्रम ॲकॅडमी मुख्य प्रायोजक आहे. पॉवर्ड बाय हॅशटॅग क्‍लोदिंग असेल.

परिषदेत सहभागी होणाऱ्या ‘यिन’च्या सदस्यांना निवास व भोजन व्यवस्थेसाठी प्रत्येकी रुपये २९९ (एक वेळच्या भोजन व्यवस्थेसह रुपेय १९९), तर सदस्येतरांसाठी रु. ४९९ शुल्क (एक वेळच्या भोजन व्यवस्थेसाठी रुपये ३९९) आहे. सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना परिषद किट आणि सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून ‘यिन’ या पद्धतीच्या शिबिरांचे आयोजन करीत असून, याआधीच्या शिबिरांमध्ये राज्यभरातील अनेक नामवंतांनी तरुणांना मार्गदर्शन केले आहे.

‘यिन समर यूथ समिट’च्या निमित्ताने ‘यिन’ महाराष्ट्रातील युवकांना एक सुवर्णसंधी उपलब्ध करून देत त्यांच्या उज्ज्वल भविष्याचा पाया भक्‍कम करीत आहे. गेल्या चार वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्र सरस बनविण्यात तत्पर असलेल्या कॅड सेंटरला ‘यिन’ची जोड लाभणे म्हणजे दुग्धशर्करायोग म्हणावा लागेल. या उपक्रमातून उद्योजक, शास्त्रज्ञ, राजकारणी, खेळाडू आदी क्षेत्रांत यशस्वी व्यक्ती पाहायला मिळतील. यात सहभागी होऊन ‘भारत निर्माण’च्या दृष्टीने एक पाऊल टाका.
-अविनाश भास्कर चाटे, उद्योजक, मोटिव्हेशनल स्पीकर यूथ आयकॉन

अधिक माहितीसाठी संपर्क :
ऐश्‍वर्या शिंदे - ७०२८०२६४७७

Web Title: summer Youth Summit in the city through 'Young Inspirators Network'