सन्डे स्पेशल- झोपडीतून फुटले जिद्दीच्या बळाला पंख

नवनाथ येवले
Sunday, 5 January 2020

झोपडीतल्या हातापुरत्या व्यवसायाला सायकल टॅक्सी- स्टोअर्स, हॉटेल, फूटवेअर अशा मार्केटमधील व्यवसायांची सांगड घालत महेमूदचा झोपडीपासून ते एका आलीशान मॉलपर्यंतचा प्रवास युवा पिढीला प्रेरणादायी ठरणारा आहे. 

नांदेड : शिक्षणासाठी मामाच्या गावात अश्रयाला असलेल्या महेमूद शेख याने माध्यमिक शिक्षण चालू असताना एका झोपडीत मशरुमचा व्यवसाय सुरू केला. झोपडीतल्या मशरुम व्यवसायाला बरकत मिळल्याने त्यातून मिळणाऱ्या पैशातून महेमूदने पदवीपर्यंत शिक्षण घेतले. घरच्या हालाखीच्या परिस्थितीमुळे लहान तीन भावांसह कुटुंबाची जबाबदारी महेमूदच्या खांद्यावर पडली. कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत उच्चशिक्षणाच्या जिद्दीला मशरुमच्या मिळकतीने आयाम मिळाला. झोपडीतल्या हातापुरत्या व्यवसायाला सायकल टॅक्सी- स्टोअर्स, हॉटेल, फूटवेअर अशा मार्केटमधील व्यवसायांची सांगड घालत महेमूदचा झोपडीपासून ते एका आलीशान मॉलपर्यंतचा प्रवास युवा पिढीला प्रेरणादायी ठरणारा आहे. 


स्वतःच्या माॅलपर्यंत पोहचलेला महेमूद

मामाच गाव म्हटल की आनेकांना बालवयातील प्राथमिक शिक्षणाचे चित्र डोळ्यांसमोर उभे राहते. यामागे नात्यातील सलोखा राखण्यासाठी मामाच्या गावाकडं पहाण्याचा दृष्टिकोन असला तरी बहुतांश वेळा कौटुंबिक हालाखीच्या परिस्थितीमुळे शिक्षणासाठी मामाच्या गावाचा अश्रय घ्यावा लागतो. पण या गोष्टी त्या वयात गौण असतात. असाच सावळी (ता. बिलोली) येथील महेमूद शेख यांनी कौटुंबिक हालाखीच्या परिस्थितीमुळे बालवयात चिंचाळा (ता. उमरी) या मामाच्या गावाचा शिक्षणासाठी अश्रय घेतला. खूप शिकून मोठ व्हायंच एवढ्याच ढोबळ जिद्दीने नववीपर्यंतचे शिक्षण सुरू असताना मूळ गावी सावळी येथे झोपडीत मशरुमचा व्यवसाय सुरू केला. उत्पादनाच्या तुलनेत चांगला बाजारभाव मिळत असल्याने महेमूदने व्यवसायाबरोबर माध्यमिक शिक्षणातही तेवढेच झोकून दिले. 

झोपडीतून मिळाले बाळकडून 
दहावी उत्तर्ण झाल्यानंतर १९९५ ला हवामान बदलांचा मशरुम उत्पादनावर प्रादुर्भाव झाला. मामाच्या गावात शिक्षण सुरू असताना कौटुंबिक जबाबदारी सांभाळण्यासाठी सुरू केलेला त्यांचा मशरुमचा व्यवसाय डबघाईला आला. पण महेमूदने निराश होऊन हार मानली नाही. अशिक्षित आई-वडिलांना महेमूदने उच्च शिक्षण घेऊन पगाराची नोकरी करावी, अशी आशा होती, ती सहाजिकच. बारावीचे शिक्षण सुरू असताना मशरुमचा व्यवसाय डबघाईला आल्याने मोठ्या दोन भावांच्या शेतमजुरीतून मिळणाऱ्या रोजगावर कुटुंबाची गुजरान कठीन  होती. बारावी बोर्ड परीक्षेच्या कालाधीत १९९७ ला बिलोली शहरात एका किरायाच्या खुल्या जागेत लाकडाची ताटी उभारून जुन्या पाच सायकलींच्या भांडवलावर सायकल टॅक्सी व स्टोअर्सचा हातापुरता व्यवसाय सुरू केला. झोपडीत मिळालेल्या व्यवसायाच्या बाळकडूची शहरातील व्यवसायाल बरकत मिळाली. 

हेही वाचा‘या’साठी महिलेचे कान तोडले

व्यवसाय संभाळत केली सेवा 
यादवराव तुडमे यांच्या जागेत किरायाने सुरू केलेल्या लाकडाच्या ताटीतल्या सायकल टॅक्सी व्यवसायाच्या जोरावर अशिक्षित वडिलांना किरायाच्या जागेत हॉटेल व्यवसाय सुरू करून दिला. त्यामुळे बिलोली शहरात महेमूदचे दोन व्यवसाय उभे रहिले. पदवीचे शिक्षण सुरू असताना कुटुंबातील सदस्यांना व्यवसायात खेचण्यासाठी महेमूदने लहान भावासाठी महेक नावाने फूटवेअरचा व्यवसाय सुरू केला. दोन शेतमजुरी करणाऱ्या भावांसाठी हॉटेलच्या जागेत महेक नावाने मिठाई हलवाईचे दुकान सुरू केले. व्यवसायाला सेवेची जोड मिळावी, या उद्देशाने महेमूदने होमगार्डच्या मध्यमातून सेवा बजावली. 

हेही वाचाचनांदेडला महाविकास आघाडीची रणनीती

कुटूंबीयांनाही घेतले सामावून 
झोपडीपासून सुरू केलेल्या हातापुरत्या व्यसायातून मिळालेल्या अनुभवाच्या जोरावर महेमूदने बिलोली शहरात ‘महेक’च्या विविध शाखा स्थापन करत वडिलांसह चार भावांना व्यवसायामध्ये सामावून घेतले. झोपडीपासून मिळालेल्या व्यवसायाच्या बळाकडूचा अनुभव शहराच्या मार्केटमध्ये रुजल्याने एक मशरुम, सायकल, हॉटेल, फूटवेअर चा व्यवसायिक महेक जनरल स्‍टोअर्स  लेडीज एम्‍पोरियम या आलीशान मॉलचा मालक बनला आहे. याशिवाय बिलोली शहरात महेकच्या विविध शाखांच्या माध्यमातून वडिलांसह चार भवांचे कुटुंब स्थिरावले आहे. 

हेही वाचलेच पाहिजेपुतळे उभारणीसोबतच विचारांचीही पेरणी आवश्यक

वेळोवेळी मदतीचा हात 
शेख महेमूद हा एक कुशल व चांगल्‍या वृत्तीचा असून मी महेमूद यांची व्‍यावसाय करण्याचा उत्‍सुक्‍ता पाहून त्‍याला तुडमे कॉम्‍पलेक्‍समध्ये व्‍यावसाय करण्यास संधी दिली. आडीअडचणींच्‍या ठिकाणी मदत केली. शेख महेमूद हा मेहनती असून त्‍याचे व्‍यावसाय उभारण्याची जिज्ञासा मला त्‍यात दिसून आल्‍याने मी त्‍यास वेळोवेळी मदतीचा हात दिला.  
यादवराव तुडमे, माजी नगराध्यक्ष, नगर परिषद, बिलोली 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sunday Special - Stubborn force broke out from the hut