कडक उन्हाने महागला आंबा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 एप्रिल 2017

 आंब्याचे भाव (प्रतिकिलो) 
- लालबाग आंबा 60 रुपये 
- हापूस 200 रुपये 
- केशर 120 रुपये 
- लंगडा 120 रुपये 
- बादाम 70 रुपये 

माजलगाव - फळांचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंब्याला तीव्र उन्हाचा फटका बसल्याने मोहर जळाला आहे. त्यामुळे बाजारात आंबे कमी प्रमाणात येत असल्याने किमतींत वाढ झाली आहे. यामुळे ग्राहकांच्या खिशाला झळ बसत आहे. 

देवगड, हापूस, दशेरी, केशर, लंगडा, लालबाग, बादाम या जातीचे आंबे अक्षय तृतीयेच्या मुहूर्तापेक्षा आधी बाजारात उपलब्ध झाले. या आंब्यांना टिकविण्याचे आवाहन विक्रेत्यांसमोर आहे. यावर्षी उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली असल्याने या उन्हामुळे आंबे वेळेआधीच पिकले आहेत. अवघ्या दहा दिवसांवर असलेल्या अक्षय तृतीयेच्या सणासाठी आंब्याची बाजारपेठ भरली आहे. तीव्र उन्हामुळे लालबाग, केशर आदी जातींच्या आंब्याचा मोहर जळाल्याने या जातीचे आंबे बाजारात कमी प्रमाणात आले आहेत. 

Web Title: sunglasses hit to mango

टॅग्स