दीप मुनीमला दुहेरी मुकुटाची संधी 

दीप मुनीमला दुहेरी मुकुटाची संधी 

औरंगाबाद : एड्युरन्स्‌ मराठवाडा-एमएसएलटीए टेनिस सेंटर (इएमएमटीसी) तर्फे आयोजित एमएसएलटीए-योनेक्‍स्‌ सनराईज्‌ इएमएमटीसी 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत हरियाणाच्या आठव्या मानांकीत युवान नांदलने कर्नाटकच्या अव्वल मानांकीत आयुश भटचा पराभव करत खळबळजनक निकालाची नोंद केली.

विभागीय क्रीडा संकुलात सुरु असलेल्या या स्पर्धेत एकेरी गटात उपांत्यपूर्व फेरीत मुलांच्या गटात हरियाणाच्या आठव्या मानांकीत युवान नांदलने कर्नाटकच्या अव्वल मानांकीत आयुश भटचा 3-6,6-0,6-4 असा तीन सेटमध्ये पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

महाराष्ट्राच्या चौथ्या मानांकीत अर्जुन गोहडने आपल्या विजयी कामगिरीत सातत्य राखत पश्‍चिम बंगालच्या आकराव्या मानांकीत अरुनवा मजुमदारचा 6-2, 6-3 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली. मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या दुसऱ्या मानांकीत परी सिंगने तेलंगणाच्या आकराव्या मानांकीत अपूर्वा वेमुरीचा 6-1, 6-2 असा सहज पराभव उपांत्य फेरीत प्रवेश केला. कर्नाटकच्या सुहिता मारुरीने तामिळनाडूच्या अनन्या एसआर हीचा 6-4, 6-4 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली.

दुहेरी गटात उपांत्य फेरीत मुलांच्या गटात दीप मुनीम, आयुष भट या जोडीने अरूनवा मुजुमदार व अर्जुन गोहड यांचा 6-2, 6-3 असा तर आयुष्मान अरजेरिया व युवान नांदल यांनी आदित्य राठी व काहीर वारीक यांचा 4-6,7-5, 10-6 असा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. मुलींच्या गटात अपुर्वा वेमुरी व अभया वेमुरी यांनी सायना देशपांडे व ईशीता जाधव यांचा 7-5, 7-5 असा तर राधिका महाजन व अंजली राठी या जोडीने सुर्यांशी तन्वर व मधुरीमा सावंत यांचा 6-2, 6-0 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com