शासकीय रुग्णालयांची होतेय ‘पाणीकोंडी’

औरंगाबाद - सुपरस्पेशालिटी विंगची पाहणी करताना डॉ. कानन येळीकर, डॉ. अनिल गायकवाड, डॉ. अनंत बिडकर, एचएससीसीचे अभियंता भटनागर, सुजित ठाकरे आदी.
औरंगाबाद - सुपरस्पेशालिटी विंगची पाहणी करताना डॉ. कानन येळीकर, डॉ. अनिल गायकवाड, डॉ. अनंत बिडकर, एचएससीसीचे अभियंता भटनागर, सुजित ठाकरे आदी.

औरंगाबाद - घाटीत दीडशे कोटींच्या निधीतून सुपरस्पेशालिटी विंगच्या माध्यमातून आठ सुपरस्पेशालिटी ब्रॅंचच्या उपचारासाठी २५३ खाटांच्या इमारतीचे काम नव्वद टक्के पूर्ण झाले. मात्र, त्या शासकीय इमारतीला नवीन नळजोडणी द्यायला नकार देणारे लेखी पत्रच महापालिकेने घाटीला दिल्याने घाटी प्रशासनासमोर पाणीपुरवठ्याचा प्रश्‍न उभा ठाकला आहे. 

घाटी प्रशासन ८ मे २०१८ पासून नळासाठी महापालिकेकडे पाठपुरावा करत आहे. मात्र, महापालिकेकडून कागदोपत्री घोडे नाचवले जात आहेत. तर कार्यकारी अभियंते वेळकाढू भूमिका घेत असून २७ नोव्हेंबरला नवीन कनेक्‍शन देण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले. शिवाय घाटीत पाणी पुरत नसल्याने टॅंकरने पाणीपुरवठा करण्याचेही म्हटले आहे. 

अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी बुधवारी (ता. २०) या विंगच्या कामाची पाहणी करून आढावा घेतला. यावेळी नोडल ऑफिसर डॉ. अनंत बीडकर व डॉ. अनिल वाघमारे, डॉ. अमोल जोशी, एचएससीसीचे श्री. भटनागर, सुजित ठाकूर यांची उपस्थिती होती. दरम्यान, येत्या दोन महिन्यांत काम पूर्ण होण्याची शक्‍यता अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी वर्तवली आहे. असा आहे प्रकल्प पीएमएसएसवाय फेज-तीनमधून ६३.१७ कोटींची पाचमजली २५३ खाटांची इमारत बांधण्याचे काम सुरू आहे. हे बांधकाम ९० टक्के पूर्ण झाले असून आतापर्यंत ४६.०३ कोटींचे बांधकाम पूर्ण झाले. तर ४९.२५ कोटींचे यंत्रसामग्रीचे काम दुसरी कंपनी करत आहे. त्यातून आतापर्यंत ८.६७ कोटींची यंत्रसामग्री आली आहे. 

घाटीतील सद्यःस्थिती
घाटी परिसरात दररोज भरती दीड हजाराहून अधिक रुग्ण, तीन हजारांहून अधिक बाह्यरुग्ण, त्यांचे नातेवाईक, हजारावर विद्यार्थी, तीन हजार अधिकारी-कर्मचारी, कर्मचाऱ्यांचे निवासस्थान, विद्यार्थ्यांचे व निवासी डॉक्‍टर, नर्सिंग वसतिगृह, धोबीघाट, ऑपरेशन थिएटरसाठीच मुबलक पाणी महापालिकेकडून उपलब्ध होत नसल्याने सध्या टॅंकरवर मदार आहे. एसटीपी ईटीपी प्लॅंट अद्याप सुरू झाला नाही. रेन वॉटर हार्वेस्टिंगसह नैसर्गिक स्रोतांचा वापर करूनही पाण्याची कमतरता घाटीत भासत आहे.

मिनी घाटीच्या मागणीलाही खो
दोनशे खाटांच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाने ऑक्‍टोबर २०१७ पासून नव्या स्वतंत्र पाइपलाइनची मागणी केली आहे. त्या पाइपलाइनसाठी तत्कालीन पालकमंत्री रामदास कदम, तत्कालीन आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्यासह जिल्हा शल्यचिकित्सकांनी सातत्याने पाठपुरावा करूनही ही पाइपलाइन अद्याप झालेली नाही. त्यामुळे मिनी घाटी पाणीटंचाईचा सामना करत आहे. एप्रिलमध्ये हे रुग्णालय पूर्ण क्षमेतेने सुरू होईल, त्यावेळी रुग्णांसह नातेवाइकांची पाण्यासाठी भटकंती अटळ आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com