औरंगाबादेत स्वच्छता निरीक्षकाला मारहाण 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 जून 2018

औरंगाबाद : महापालिकेने तयार केलेल्या कंपोस्टींग पीटमध्ये कचरा टाकण्यास विरोध करत स्वच्छता निरीक्षकाला बेल्टने मारहाण करण्यात आल्याची घटना बुधवारी (ता.27) सकाळी चिकलठाणा भागात घडली. त्यानंतर संतप्त झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांनी आरोपीवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी करत काम बंद आंदोलन केले. महापौर, उपमहापौरांनी कर्मचाऱ्यांची भेट घेतल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. 

कचराकोंडीनंतर चिकलठाणा भागात महापालिकेने कंपोस्टींग पीट तयार केले आहे. या ठिकाणी ओल्या कचऱ्यापासून खत तयार केले जाते. नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी सफाई कर्मचारी ओला कचरा घेऊन या ठिकाणी गेला असता, इथे यापुढे कचरा आणायचा नाही, असे म्हणत अर्जुन अंकुश बकाल याने विरोध केला. त्यानंतर स्वच्छता निरीक्षक प्रकाश आठवले हे घटनास्थळी पोचले. आपल्याला देखील बकाल याने बेल्टने मारहाण केली, असा आरोप आठवले यांनी केला. इतर कर्मचाऱ्यांना त्यांनी घटनेची माहिती दिल्यानंतर आरोपीवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करत शेकडो कर्मचारी चिकलठाणा एमआयडीसी पोलिस ठाण्यात जमा झाले. या वेळी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर विजय औताडे यांनीही पोलिस ठाण्यात धाव घेतली. 

कामबंद आदोलनावरून झापाझापी 
कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केल्यावरून महापौर, उपमहापौरांनी झापाझापी केली. आंदोलनाचे नेतृत्व कोणी केले, असा जाब त्यांनी विचारला. त्यानंतर संशयित आरोपीवर कारवाई करण्यात येईल, असे आश्‍वासन पदाधिकाऱ्यांनी दिल्याने कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन मागे घेतले. मात्र लवकरच आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल, असे कामगार शक्ती संघटनेचे गौतम खरात

Web Title: supervisor of cleaner beaten by other