दिनेश परदेशी यांना निवडणूक लढविण्याचा आग्रह

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

भाजपचे डॉ. दिनेश परदेशी यांना समर्थकांनी अपक्ष निवडणूक लढण्याचा आग्रह धरला आहे. येथे बुधवारी आयोजित समर्थकांच्या मेळाव्यात सर्वपक्षीय कार्यकर्ते, स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी व सर्व समाजातील नागरिकांनी परदेशी यांना विनाअट पाठिंबा जाहीर केला. समर्थकांच्या पाठिंब्यामुळे परदेशी यांनी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी दर्शविली.

वैजापूर, ता. 2 (बातमीदार) ः भाजपचे डॉ. दिनेश परदेशी यांना समर्थकांनी अपक्ष निवडणूक लढण्याचा आग्रह धरला आहे. येथे बुधवारी आयोजित समर्थकांच्या मेळाव्यात सर्वपक्षीय कार्यकर्ते, स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी व सर्व समाजातील नागरिकांनी परदेशी यांना विनाअट पाठिंबा जाहीर केला. समर्थकांच्या पाठिंब्यामुळे परदेशी यांनी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी दर्शविली.

वैजापूरची जागा शिवसेनेच्या वाट्याला आल्यानंतर डॉ. परदेशी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती; पण शिवसेनेतर्फे रमेश बोरनारे यांना उमेदवारी जाहीर झाल्याने समर्थकांची मते जाणून घेण्यासाठी मेळावा घेण्यात आला. अध्यक्षस्थानी काशीनाथ गायकवाड होते. भगवान तांबे, सारंगधर डिके, जयमाला वाघ, खुशालसिंह राजपूत, एल. एम. पवार, सुभाष आव्हाळे, संतोष गायके, ऍड. बागूल, शोभाचंद संचेती आदींनी डॉ. परदेशी यांना अपक्ष लढण्याचा आग्रह धरला. डॉ. परदेशी म्हणाले, ""वीस-पंचवीस वर्षे मी राजकारणाच्या माध्यमातून येथील जनतेची सेवा केली. त्यामुळेच नगरपालिका जनतेने ताब्यात दिली. शहरवासीयांसाठी अनेक विकासकामे केली; मात्र ग्रामीण भागात अजूनही विकासकामे प्रलंबित आहेत.'' जगन गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. शिल्पा परदेशी, दशरथ बनकर, मजीद कुरेशी, दीप टेके, राजूसिंह राजपूत आदींची उपस्थिती होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Support Demands Dinesh Pardeshi To Contest Election