esakal | हिंगोलीत पत्रकारांचे आत्मक्लेश आंदोलनास पाठिंबा

बोलून बातमी शोधा

हिंगोली पत्रकार संघ
हिंगोलीत पत्रकारांचे आत्मक्लेश आंदोलनास पाठिंबा
sakal_logo
By
राजेश दार्वेकर

हिंगोली : हिंगोलीत पत्रकांराच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे आत्मक्लेश अंदोलन करणाऱ्या एस. एम. देशमुख ह्यांना पाठींबा म्हणून शनिवारी ता. एक मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणीक धरणे आंदोलन करुन जिल्हा प्रशासनाकडे निवेदन देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात नमुद आहे की राज्यातील पत्रकारांनी आपल्या विविध मागण्यां करता अर्ज, विनंत्या केल्या, आंदोलनं झाली, हजारो इमेल पाठवून पप्रश्नांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र पत्रकारांच्या प्रती सरकार उदासिन असल्याचे वारंवार दिसून आलं. पत्रकारांकडे सरकार अक्षम्य दुर्लक्ष करीत असल्याने आणि पत्रकारांना वेळेत आणि योग्य उपचार मिळत नसल्याने पत्रकारांचे कोरोनानं मृत्यू होत आहेत. हा आकडा ११३ झाला आहे. क्षणाक्षणाला तो वाढतोय. जवळचे मित्र एकापाठोपाठ सोडून जात असल्याने माध्यम जगतात मोठी काळजी भिती व्यक्त केली जात आहे. सरकार मात्र बेफिकीर आहे.

हेही वाचा - वसमतमध्ये १०० बेडचे विनामुल्य कोविड सेंटर चालवणार; कन्हैया बाहेतीनी मागितली परवानगी

सर्व वयोगटातील पत्रकारांना लस द्यावी, कोरोना बळी ठरलेल्या पत्रकारांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत मिळावी, पत्रकारांसाठी रुग्णालयात ऑक्सीजन, व्हेंटिलेटरचा बेड राखीव ठेवावा आणि योग्य उपचार मिळावेत अशा मराठी पत्रकार परिषदेने मागण्या केलेल्या आहेत. त्यासाठी आंदोलनही केले. मात्र मागण्या पूर्ण होत तर नाहीतच. हे सारं हेतूतः होतंय का अशी शंका घ्यावी एवढी उदासिनता दिसते आहे.

दुर्दैवानं कोरोनानं सगळ्यांना घरातच जेरबंद केल्याने रस्त्यावर येता येत नाही. काही करता ही येत नाही. ही अगतिकता अस्वस्थ करणारी आहे. तणाव वाढविणारी आहे. सरकारच्या पत्रकारांप्रतीच्या निष्काळजीपणाचा निषेध करण्यासाठी ता. एक मे रोजी महाराष्ट्र दिनी मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त , पत्रकार संरक्षण कायद्याचे जनक एस. एम. देशमुख यांनीआत्मक्लेष आंदोलन सुरु केले आहे. आंदोलनाचा एक भाग म्हणून दिवसभर अन्नत्याग करणार आहेत. मराठी पत्रकार परिषद आणि राज्यातील तमाम पत्रकारांनी आंदोलनास पाठिंबा दिलेला असुन हिंगोली जिल्हा मराठी पत्रकार संघाचे वतीने देखील जिल्हाधिकारी कार्यालयापुढे कोरोना संसर्ग रोगा करता शासनाने लावलेले निर्बंध पाळुन धरणे आंदोलन करण्यात आले.

शासनाने वरिल मागण्यावर तातडीने लक्ष घालुन मंजुर कराव्यात अशी विनंती मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य ह्यांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पाठविण्यात आले. असुन निवेदानावर जिल्हाध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल, हिंगोली तालुका अध्यक्ष प्रकाश ईंगोले, कन्हैया खंडेलवाल, सुभाष अपुर्वा, प्रेस फोटो ग्राफर सुनील पाठक, विजय गुंडेकर ह्यांच्या स्वाक्षरी आहेत.

संपादन- प्रल्हाद कांबळे