साबांचे उपसचिव धोंडगेसह इतरांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

court.jpg
court.jpg

नांदेड : सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपसचिव तथा नांदेड विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता अविनाश धोंडगे, कार्यकारी अभियंता तोटावाड यांच्यासह १४ जणांचा फौजदारी अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमुर्ती एस. एस. शिंदे व न्यायमुर्ती एस. एस. पाटील यांनी फेटाळली होती. या अर्जाला धोंडगे यांनी सर्वोच्च न्यायालयात स्पेशल लिव्हपिटीशन क्र. २७२५/१८ आव्हान दिले होते. ती याचिका सर्वोच्च न्यायालयाने ता. सहा एप्रील २०१८ च्या आदेशानुसार दुसऱ्यांदा फेटाळले.

मजूर सोसायटीचे खोटे शिफारसपत्र तयार करणे, अंदाजपत्रक व करारनाम्यात नसलेली कामे मोजमाप पुस्तिकेत नोंदविणे, मजूर सोसायटीला न देता येणारी कामे, कामाचे तुकडे पाडणे अशी कामे २००८ ते २०११ या काळात नांदेडात गुरू- ता- गद्दीच्या काळात करण्यात आली. या प्रकरणात प्रथम श्रेणी न्यायालयाने शिवाजीनगर पोलिसांना चौकशीचे आदेश दिले होते. शिवाजीनगर पोलिस ठाण्यात धोंडगे यांच्यासह कार्यकारी अभियंता तोटावाड, सहायक निबंधक नारायण आघाव, दीपक देवतराज, अविनाश भायेकर, सुरेंद्र गवारे, सुरेंद्र वाघमारे, मोहन सांगवीकर, बेलकर, एम.एम. सय्यद, वसमतकर, अश्फाक अली, सुदेश देशमुख यांच्यासह एकूण १४ जणांविरूद्ध गुन्हाही नोंदविण्यात आला होता. त्यावर धोंडगे व इतरांनी २३ सप्टेंबर २०१३ चा आदेश रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com