अहो आश्चर्यम्! दुष्काळी बीडमध्ये उडतायत पाण्याचे फवारे (व्हिडिओ)

वृत्तसंस्था
सोमवार, 14 जानेवारी 2019

देवाची करणी अन् नारळात पाणी या म्हणीप्रमाणे निसर्गाची करणी अन दीडशे फुटावर पाणी अशी प्रचिती बीड जिल्ह्यासारख्या दुष्काळी भागातील आष्टी तालुक्यात आली आहे.

आष्टी (जि. बीड)- देवाची करणी अन् नारळात पाणी या म्हणीप्रमाणे निसर्गाची करणी अन दीडशे फुटावर पाणी अशी प्रचिती बीड जिल्ह्यासारख्या दुष्काळी भागातील आष्टी तालुक्यात आली आहे.

दुष्काळामुळे बीड जिल्ह्यात बहुतांशी जलस्त्रोत कोरडेठाक आहेत. अगदी 500 फुटापर्यंत खोदलेल्या विंधन विहिरीतून धुराळा निघत आहे. पंरतु, आष्टी तालुक्यातील कासेवाडी येथे नुकतेच दीडशे फुटावर पाण्याचे फवारे उडालेले पाहून चकित झाल्याशिवाय राहत नाही.

आष्टी तालुक्यातील कासेवाडी येथे नुकतेच बोअरवेल दीडशे फुटावर जोरदार पाणी लागले आहे. अशा दुष्काळातही दीडशे फुटावर पाणी लागल्याने बोअरवेल घेणारा शेतकरी मात्र सुखावला आहे.

Web Title: surprise Water springs in a drought beed