दानपेटी चोरून नेणाऱ्या संशयित आरोपीस अटक

चित्र
चित्र

जायकवाडी (जि.औरंगाबाद) : पैठण औद्योगिक वसाहत परिसरातील वाहेगाव (ता. पैठण) येथील जागृत देवस्थान असलेल्या सावशिद बाबा म्हणजेच नागनाथ मंदिरातील दानपेटी शनिवारी (ता. सात) रात्री चोरट्याने चोरून नेली. या घटनेचा गुन्हा दाखल करून, पोलिसांनी अवघ्या चार तासांत मंदिरातील सीसीटीव्हीच्या मदतीने संशयितास गजाआड केले.

पैठण औद्योगिक वसाहत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाहेगाव येथील नागनाथ मंदिर समितीचे अध्यक्ष रामेश्वर बोबडे यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. यात म्हटले आहे, की शनिवारी (ता. सात) रात्रीच्या सुमारास चोरट्याने मंदिराच्या गाभाऱ्याच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. मंदिरासमोर ठेवलेली लोखंडी दानपेटी चोरट्याने पळवून नेली. पाचलगाव रस्त्यावरील अंकुश जीजा बोबडे यांच्या मोसंबीच्या बागेमध्ये ही दानपेटी फोडून त्यातील अंदाजे दहा ते पंधरा हजार रुपये घेऊन चोरटा पळून गेला.

रामेश्वर बोबडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. मंदिरात बसविलेल्या सीसीटीव्हीच्या फुटेजआधारे संशयित आरोपी गणेश हानवते, रा. पाचलगाव याने चोरी केल्याचे दिसून आले. त्यानुसार त्यास अटक करण्यात आली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार विद्या झिरपे, बीट जमादार संपत दळवी, जाकेर शेख, प्रदीप जाधव करीत आहेत.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com