लातुरात तरुणाचा संशयास्पद मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

मुरूड येथील तरुणाचा मृतदेह येथील गोरक्षणच्या परिसरात सापडला आहे. या तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला असून याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

लातूर ः मुरूड येथील तरुणाचा मृतदेह येथील गोरक्षणच्या परिसरात सापडला आहे. या तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला असून याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

मुरूड येथील तरुण भारत सुधीर महाजन (वय 24, रा. मुरूड) हा ता. 23 सप्टेंबर रोजी लातूर येथे एका दवाखान्यात आला होता. त्यानंतर तो परत घरी गेलाच नाही.

याप्रकरणी ता. 25 सप्टेंबर रोजी येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात मिसिंगची तक्रारही दाखल झाली होती. दरम्यान, शुक्रवारी (ता. 27) या तरुणाचा मृतदेह गोरक्षणाच्या परिसरात सापडला आहे.

त्याच्या पायाला त्याची पॅंट बांधण्यात आलेली आहे. त्यामुळे त्याचा मृत्यू संशयास्पद असून त्याचा तपास शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Suspected death of youth in Latur