बीड जिल्ह्यात परिवहन महामंडळाचे ८१ कर्मचारी निलंबीत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 जून 2018

बीड : कुठलीही नोटीस न देता अघोषित संप करुन प्रवाशांना वेठीस धरणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या ८१ कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्यात आले. पाच वाजेपर्यंतच्या कारवाईचा हा आकडा असून, संध्याकाळ पर्यंत यामध्ये वाढ होण्याचा अंदाज आहे.

बीड जिल्ह्यातील आठ आगारांपैकी आष्टी आगारातील सेवा पुर्णपणे सुरळीत होती. उलट रोजच्यापेक्षा अधिक बस या आगारातून सोडण्यात आल्या. अंबाजोगाई व बीडमध्येही तुलनेने संपाचा परिणाम कमी आहे. तर, परळी, धारुर, गेवराई, पाटोदा व माजलगाव आगारातील सेवा विस्कळीत आहे. कुठलीही नोटीस न देता कामावर हजर न झालेल्या ८१ कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्यात आले. महामंडळात सकाळ, दुपार, संध्याकाळ असे कामावर हजर होण्याच्या वेळा आहेत. सकाळ आणि दुपारच्या सत्रात कामावर हजर न झालेल्यांचा आकडा ८१ होता. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. संध्याकाळी हजर न होणाऱ्यांवरही कारवाई केली जाणार असल्याची माहिती राज्य परिवहन महामंडळाचे बीड जिल्हा विभाग नियंत्रक गौतम जगतकर यांनी ‘सकाळ’ ला सांगीतले.

निलंबीत कर्मचारी
चालक : ३८
वाहक : ३६
लिपीक : ०३
वाहन परिक्षक : ०१
वाहन नियंत्रक : ०३
----
एकूण : ८१

Web Title: Suspended 81 st employees in Beed district