शरीरसुखाची मागणी करणारा अधिकारी व शिपाई निलंबित 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 जून 2018

दाताळा (जि. बुलडाणा) - पीककर्ज मंजूर करून देण्यासाठी शेतकऱ्याच्या पत्नीला शरीरसुखाची मागणी करणारा सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाचा शाखाधिकारी व शिपाई यांना बॅंकेने निलंबित केले. या प्रकरणात पोलिसांनी गुरुवारी रात्री गुन्हा दाखल केलेला असून, आरोपी शाखा व्यवस्थापक अद्याप फरार आहे, तर दुसरा आरोपी बॅंक शिपायाला अटक करण्यात आली आहे. 

बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्‍यातील दाताळा या गावातील शेतकरी त्याच्या पत्नीसोबत पीककर्जासाठी गुरुवारी येथील सेंट्रल बॅंके शाखेत गेला होता. कागदपत्रांची चाळणी करून तुमचा मोबाईल नंबर द्या, अशी सूचना बॅंक व्यवस्थापकाने केली. संबंधित शेतकऱ्याने त्याच्या पत्नीचा मोबाईल नंबर दिला. त्यावर शाखाधिकाऱ्याने अश्‍लील संभाषण करून शरीरसुखाची मागणी केली. मोबदल्यात पीककर्जासोबत वेगळे पॅकेज देईल, असा निरोप शिपायामार्फत महिलेला पाठविला. संबंधित महिलेने बॅंक व्यवस्थापकाशी झालेल्या संवादाचे रेकॉर्डिंग करून मलकापूर ग्रामीण पोलिसांत तक्रार नोंदविली. त्याअनुषंगाने पोलिस निरीक्षक बी. आर. गावंडे यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात तपासचक्रे फिरविली. 

चौकशी अंती गुरुवारी रात्री महिलेच्या तक्रारीवरून सेंट्रल बॅंकेचे शाखाधिकारी राजेश हिवसे व शिपाई मनोज चव्हाण या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला. दरम्यान, आरोपी शिपाई मनोज चव्हाण यास अटक करण्यात आली असून, शाखाधिकारी फरार आहे. दोघांच्या निलंबनाचे आदेश विभागीय कार्यालयातून देण्यात आले. शाखाधिकारी हिवसे याचा पोलिस शोध घेत आहेत. 

Web Title: Suspended Central Bank of India officers and Peon