दोन अव्वल कारकुनासह तीन लिपीक निलंबीत

कैलास चव्हाण
बुधवार, 27 जून 2018

दोन अव्वल कारकुनासह तीन लिपीकावर निलंबनाची कारवाई जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी केली आहे.

परभणी - वरिष्ठांच्या आदेशाचे उल्लघंन केल्याप्रकरणी परभणी तहसिल मधील दोन अव्वल कारकुनासह तीन लिपीकावर निलंबनाची कारवाई जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी केली आहे. यातील एक लिपीक सेलु तहसिल कार्यालयातील आहे.

परभणी तहसिल कार्यालयातील अव्वल कारकुन सुग्रीव मुंडे, एस. के. हिंगे यांची परभणीतील शासकीय गोदामात गोदामपाल म्हणून तर याच तहसिलमधील लिपीक दिपक कुलकर्णी व अशिष राठोड आणि सेलु तहसिल कार्यालयातील लिपीक ए. के. ढगे यांच्या नावाने सहायक गोदामपाल म्हणून प्रतिनियुक्तीचे आदेश जिल्हा प्रशासनाने काढले होते. मात्र या सर्वांनी दिलेला पदभार घेतला नाही, वरिष्ठांच्या आदेशाची अवहेलना करुन कर्तव्यात कसुर केला असल्याचे जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी नमुद करीत मंगळवारी (ता. 26) उशीरा त्यांच्या निलबंनाचे आदेश काढले आहेत. गतवर्षी परभणीत तहसिल अंतर्गत 28 कोटीचा धान्य घोटाळा उघडकीस आल्यानंतर शासकीय धान्य गोदामात काम करण्यास कर्मचारी टाळाटाळ करीत असल्याचे यानिमीत्ताने उघड झाले आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Suspended three lipik with two clerks at parbhani tahasil