esakal | ‘त्या’ व्यक्तीच्या सहवासातील ८० जणांचे ‘स्वॅब’ निगेटिव्ह 
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

कोरोना बांधीत रुग्णाच्या सहवासातील सर्वच्या सर्व आहवाल निगेटिव्ह आल्याने जिल्हा प्रशासनास काहिसा दिलासा मिळाला आहे. शनिवारी (ता.२५) एप्रिल रोजी पुन्हा नव्याने ९६२ संशयित व्यक्तींची नोंद घेण्यात आली आहे. यातील ४९ व्यक्तींचे ‘स्वॅब’ नमुने तपासणी साठी प्रयोग शाळेत पाठविण्यात आले आहेत. तर ३८ ‘स्वॅब’ आहवालाची प्रतिक्षा आजही कायम आहे.   

‘त्या’ व्यक्तीच्या सहवासातील ८० जणांचे ‘स्वॅब’ निगेटिव्ह 

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड : नांदेड महापालिकेच्या हद्दीत पिरबुऱ्हाणनगर येथे बुधवारी (ता.२२) एका ६४ वर्षीय इसमास ‘कोरोना’ची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर जिल्हाप्रशासनाने महापालिका हद्दीत ‘कोरोना’ चाचणी घेण्याचा धडाका सुरु केला आहे. मागील दोन दिवसात २० हजारांपेक्षा अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली. या दरम्यान संशयित आढळुन आल्यास त्याचे ‘स्वॅब’ नमुने तपासणीसाठी घेण्यात येत आहेत. शनिवारी नव्याने ४९ संशयितांचे ‘स्वॅब’ तपासणीसाठी घेण्यात आले.

नांदेड जिल्ह्यात पहिला ‘कोरोना’ रुग्ण आढुन आल्याने ही तर सुरुवात आहे. या पुढे ‘कोरोना’ रुग्णांची साखळीच सापडेल असे अनेक तर्क वितर्क बांधले जात होते. परंतु जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व महापालिकेचे आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी तात्काळ पिरबुऱ्हाण भागाची पाहणी करुन तीन किलो मीटरचा परीसर सील केला. व त्या कोरोना बांधीत व्यक्तीच्या संपर्कातील जवळपास ८० व्यक्तींचे क्वॉरंटाईन करुन त्यांचे ‘स्वॅब’ तपाणीसाठी पाठविण्यात आले होते. शनिवारी त्या सर्वांचा रिपोर्ट निगेटिव्ह आले. यामुळे नागरीकांनी मनात कुठलिही भीती बाळगण्याचे कारण नसल्याचे व आफवावर विश्वास न ठेवण्याचे आवहान  जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

हेही वाचा- कोरोना : लॅब असूनही का होतोय ‘स्वॅब’ तपासणीला उशीर...?

चार दिवसात एकही नवा रुग्ण नाही

लॉकडाउनच्या एक महिण्यानंतर नांदेड जिल्ह्यात पहिला कोरोना रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. जिल्ह्यातील ‘कोरोना’चा आकडा वाढणार अशी भीती देखील व्यक्त केली जात होती. परंतु, चार दिवसानंतर सुद्धा दुसरा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. त्यामुळे यंत्रणेने सुटकेचा निश्वास सोडला आहे. मात्र, दररोज पाठविण्यात येणाऱ्या स्वॅबची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाची चिंता फारशी कमी झालेली नाही. 

हेही वाचा- टँकरमधून जालन्याहून निघालेले नांदेडात अडकले

शासकीय रुग्णालयात शर्थीचे उपचार सुरु

विशेष म्हणजे ‘कोरोना’ संक्रमीत रुग्णांच्या आठ नातेवाईकांचे ‘स्वॅब’ तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यांचा रिपोर्टबद्दल सर्वांनाच उत्सुकता लागली होती. याबद्दल प्रशासनाने वेगळी माहिती दिली नाही. त्यामुळे जनतेमध्ये संभ्रमावस्था कायम आहे. पिरबुऱ्हाणच्या त्या ६४ वर्षीय ‘कोरोना’ बाधीत रुग्णावर डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात शर्थीचे उपचार सुरु आहेत. मात्र, या रुग्णास मधुमेह, उच्चरक्तदाब आणि दमा यासारखे गंभीर आजार असल्याने रुग्णाची स्थिती नाजुक असल्याची जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी माहिती दिली.

loading image