लातुरात गळ्यात फळ, भाज्या, बांगड्याचे हार घालून आंदोलन, पाच जण ताब्यात

Swabhimani Muslim Vikas Parishad Andolan At Latur
Swabhimani Muslim Vikas Parishad Andolan At Latur

लातूर : शहरात हातगाड्यांवर विविध व्यवसाय करणाऱ्या हॉकर्सना व्यवसाय करण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी या मागणीसाठी स्वाभिमानी मुस्लिम विकास परिषदेच्या वतीने गळ्यात फळ, भाज्या, बांगड्याचे हार घालून महापालिकेसमोर सोमवारी (ता. एक) आंदोलन करण्यात आले. दरम्यान कोरोनाच्या टाळेबंदीत आंदोलन करण्यावर बंदी असल्याने या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


गेल्या अनेक वर्षांपासून शहरतील विविध ठिकाणी आपल्या उदरनिर्वाहासाठी हातगाडा व्यापारी बार्शी रोड, एमआईडीसी, शिवाजी चौक, रेणापूर नाका, बसस्थानक, गांधी मैदान, गंजगोलाई, अण्णाभाऊ साठे चौक, विवेकानंद चौक, बसवेश्वर चौक, कव्हा नाका, राजीव गांधी चौक येथे फळ व भाजीपाला विक्री करीत आहेत. टाळेबंदीमुळे या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. शहरात तीन हजारांवरून अधिक व्यावसायिक आहेत. पण त्यांची प्रशासनाने अद्याप दखल घेतलेली नाही. मोठ्या उद्योजकांच्या बाबतीत प्रशासन विचार करीत आहे, त्यांना रोटेशन पद्धतीने परवानगी देण्यात आली, ज्यांचे हातावर पोट आहे अशांना मात्र वाऱ्यावर सोडण्यात आले आहे.


विविध चौकातील हातगाडीधारकास विक्रीची परवानगी द्यावी, हातगाडावाल्याना प्रत्येक चौकात रोटेशन पद्धतीने व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी, हॉकरांना विक्रीचे प्रमाणपत्र द्यावे, गंजगोलाई मुख्य बाजारपेठ असल्यामुळे रोटेशन पद्धतीने शारीरिक अंतराचे पालन करत व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी, फेरीवाला धोरणाची त्वरित अंमलबजावणी करावी आदी मागण्या या परिषदेच्या आहेत. परिषदेचे अध्यक्ष मोहसिन खान यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी महापालिकेसमोर हे आंदोलन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी गळ्यात भाजीपाला, फळे, बांगड्यांचे हार करून गळ्यात घालून आपल्या व्यवसायाकडे लक्ष वेधले. त्यानंतर पोलिसांनी मोहसीनखान यांच्यासह शादूल शेख, अन्सार मणियार, जावेद बागवान, शकील शेख आदींना ताब्यात घेतले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com