परभणी फाट्यावर एक तास रास्ता रोको

परभणी फाट्यावर एक तास रास्ता रोको

माजलगांव : माजलगांव तालुका दुष्काळग्रस्त जाहिर करावा यासह विवीध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने परभणी फाट्यावर आज (शनिवार ता. 20) एक तास रास्ता रोको आंदोलन केले.

यावर्षी अत्यल्प पाउस झाल्याने पेरण्या झाल्या नाहीत तर पावसाअभावी रब्बीची पेरणी देखिल धोक्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणुन जनावरांच्या दावणीला चारा, पाणी द्या, बोंड अळीचे पैसे तात्काळ वाटप करा, सरसकट कर्जमाफी करा, माजलगांव तालुका दुष्काळग्रस्त जाहिर करा या मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी परभणी फाटा येथे एक तास रास्ता रोको आंदोलन शनिवारी केले. आंदोलनामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अमिन नाटकर, अशोक नरवडे, लिंबाजी लाखे, शाकेर पटेल, उध्दव साबळे, प्रदिप शेजुळ यांचेसह अनेक शेतक-यांचा आंदोलनात सहभाग होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com