राष्ट्रीय महामार्गावर सोडल्या बैलगाड्या 

राष्ट्रीय महामार्गावर सोडल्या बैलगाड्या 

परभणी : कल्याण ते निर्मल दरम्यानच्या परभणीतील राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी (ता.20) दुपारी 12 वाजता बैलगाडी सोडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. परिणामी, दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात वाहूतक ठप्प झाली असून दुष्काळ जाहीर करण्याची प्रमुख मागणी संघटनेची आहे. 

स्वाभिमानी संघटनेने शनिवारी जिल्हाभरात रास्तारोको आंदोलनाची हाक दिली होती. त्यानुसार परभणीतील काळी कमान येथे कार्यकर्ते आणि शेतकरी बैलगाड्यांसह दाखल झाले. दुपारी त्यांनी रस्त्यावर गाड्या सोडून ठिय्या मांडला. दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्याने पोलिसांनी आंदोलकांना आवाहन केले. तरीही एका तासाहून अधिकवेळ आंदोलन झाले. त्याप्रमाणे मानवात व सेलु या दोन तालुक्यातील मानवत रोडला दोनतास आंदोलन झाले. शिवाय, ईतर तालुक्यातही आंदोलन करण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com