Hingoli : हिंगोलीत 'स्वाभिमानी'चा रास्ता रोको आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hingoli
Hingoli : हिंगोलीत 'स्वाभिमानी'चा रास्ता रोको आंदोलन

Hingoli : हिंगोलीत 'स्वाभिमानी'चा रास्ता रोको आंदोलन

हिंगोली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांच्या अन्नत्याग आंदोलनास पाठिंबा दर्शवत शुक्रवारी (ता.१९) मराठवाडा-विदर्भ सीमेवरील कनेरगाव (नाका) येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तसेच विविध मागण्या संदर्भात पोलीस प्रशासनाकडे निवेदन देण्यात आले. यावेळी दामू अण्णा इंगोले,संघटनेचे नेते माधवराव पाटील गाडे, युवा जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे, संतोष सावके, चंद्रकांत सावकें आदींची उपस्थिती होती. यावेळी दिलेल्या निवेदनात ज्या जिल्ह्यांमध्ये (Hingoli) सरासरीपेक्षा २५ टक्क्यांहून अधिक पाऊस पडलेला आहे. त्या जिल्ह्यांना करारातील अटी प्रमाणे पिकविमा कंपन्यांनी स्थानिक आपत्ती समजून शेतकऱ्यांना सरसकट विमा संरक्षित रक्कम द्यावी. करारातील अटीप्रमाणे तारखांचा गोंधळ न घालता कापणी पश्चात झालेल्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना विम्याची संपूर्ण रक्कम द्यावी.

हेही वाचा: कृषी कायदे मागे घेतल्याबद्दल सोनू सूदने मोदींना म्हटले धन्यवाद !

तसेच खोटे रेकॉर्ड तयार करून शेतकऱ्यांना फसवणाऱ्या विमा कंपन्यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करावा. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारने जाहीर केलेली ५० हजार रुपये प्रोत्साहनात्मक अनुदान तातडीने द्यावे. केंद्र सरकारने सोयाबीन पेंड आयात करण्यास परवानगी दिली आहे. अजून जी पेंड आलेली नाही, त्यावर आयातीस बंदी घालावी. तसेच आयात होणाऱ्या पाम तेलावर पूर्वीप्रमाणेच तीस टक्के आयात कर लावावा जोपर्यंत सोयाबीनचे भाव प्रतिक्विंटल आठ हजार रुपयांपेक्षा जास्त होत नाही तोपर्यंत हाच निर्णय कायम ठेवावा. सोयाबीन वरील लागू केलेला पाच टक्के जीएसटी ताबडतोब रद्द करावा. कापसाचा भाव प्रतिक्विंटल बारा हजार रुपये स्थिर राहतील असे धोरण राबवावे आदी मागण्याचा यात समावेश आहे.

loading image
go to top