साडेबारा लाख रुपये खर्चाची ‘स्वजलधारा’ कुचकामी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 एप्रिल 2018

पाचोड - ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी बारा वर्षांपूर्वी थेरगाव (ता. पैठण) येथे साडेबारा लाख रुपये खर्चून राबविण्यात आलेली ‘स्वजलधारा’ पाणीपुरवठा योजना कुचकामी ठरली असून ग्रामस्थांना पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागत आहे. अहोरात्र जागता पहारा ठेवत पैठण-जालना पाणीपुरवठा योजनेच्या ‘गळक्‍या’ पाइपलाइनच्या ‘व्हॉल्व्ह’वर तहान भागवावी लागत असल्याचे चित्र पाहावयास मिळते आहे.

तीन हजार लोकसंख्येच्या थेरगाव येथील ग्रामस्थांना तहान भागविण्यासाठी बारा वर्षांपूर्वी साडेबारा लाख रुपये खर्चाची स्वजलधारा पाणीपुरवठा योजना राबविण्यात येऊन जलकुंभासह गल्लोगल्ली नळाद्वारे पाणीपुरवठ्याची पर्यायी व्यवस्था करण्यात आली.  येथील तलाव क्रमांक दोनलगत खोदण्यात आलेली पाणीपुरवठा विहीर हिवाळ्याच्या प्रारंभीच तळ गाठत असल्याने गावांत पाणीटंचाई निर्माण होऊन ग्रामस्थांना पायपीट करावी लागत आहे. हे गाव बारमाही टॅंकरवर अवलंबून असून ग्रामस्थ सकाळी शेतावर जाताना सोबत बैलगाडीत ड्रम, टाक्‍या तर कुणी कॅन नेऊन सायंकाळी परतताना त्या शेतातून भरून आणतात.

महिन्याभरापासून टॅंकर सुरू करण्यासाठी पंचायत समितीकडे प्रस्ताव सादर करण्यात आला. मात्र अद्याप टॅंकर सुरू झाले नसल्याने ग्रामस्थांची पाणीटंचाईचा मुकाबला करताना दमछाक होत आहे. शासनाने गावांचा पाणीप्रश्न कायम मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री पेयजल योजनेत गावाचा समावेश करावा.
- बद्री निर्मळ, सरपंच

Web Title: swajaldhara issue water shortage