उस्मानाबादेत तहसीलदार आक्रमक झाले, अन्... 

Osmanabad News
Osmanabad News

उस्मानाबाद : वाळूमाफीयांवर कारवाई करून गौणखनिज विभाग इतरत्र जोडावा, यासह इतर मागण्यांसाठी जिल्ह्यातील तहसलीदारांनी सोमवारपासून (ता. १६) कामबंद आंदोलन करून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरले. जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंढे यांच्याकडे तहसीलदारांनी या मागणीचे निवेदन दिले असून जिल्ह्यातील महसूल यंत्रणा ठप्प झाली आहे.
 
परंडा येथील तहसीलदार अनिल हेळकर यांच्यावर शनिवारी (ता. १४) पहाटे प्राणघातक हल्ला झाला. सीना नदीतून अवैधरित्या वाळूउपसा होत असल्याची माहिती मिळताच ते त्यांच्या सहकार्यांसह संबंधीत ठिकाणी गेले होते. त्यावेळी एक ट्रॅक्टरचालक आढळून आला. त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने जीवे मारण्याच्या हेतूने ट्रॅक्टर तहसीलदार हेळकर यांच्या अंगावर घालून जखमी केले.

हेळकर यांना उपचारासाठी पुण्यातील दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले असून त्यांच्यावरील उपचारासाठी २५ लाख रुपये देण्याची मागणी तहसीलदार संघटनेकडून करण्यात आली आहे. शिवाय अटक न झालेल्या दोषींना तात्काळ अटक करून १०० दिवसात खटल्याचा निकाला लावावा. गौण खणिज विभाग महसूल प्रशासनाकडून काढून स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वीत करण्यात यावी. अवैध गौणखणिज प्रकरणात कारवाई झालेल्यांवर तडीपारीची कारवाई करण्यात यावी. अवैध गौणखनिज उत्खनन आणि वाहतूक प्रतिबंधक पथक तयार करण्यात यावे, आदी मागण्या याद्वारे करण्यात आल्या आहेत. विविध तालुक्यातील तहसीलदार, नायब तहसीलदार यांच्या आदींच्या निवेदनावर सह्या आहेत. 

बेमुदत कामबंद आंदोलन

दुपारी एकच्या सुमारास तहसीलदारांना निवेदन दिल्यानंतर सर्वच तालुका स्तरावर कामबंद आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात महसूल यंत्रणा ठप्प झाली आहे. तहसील स्तरावर सुरू झालेल्या आंदोलनामुळे सोमवारी कामाच्या दिवशीच कामकाज ढेपाळले. बाहेर गावाहून कामासाठी आलेल्या अनेक नागरिकांची गैरसोय झाल्याने त्यांना मनस्ताप सहन करावा लागला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com