चुकीची मीटर रीडिंग घेणाऱ्या एजन्सीवर कारवाई करा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 एप्रिल 2017

बीड - महावितरणचे बिल अदा करण्याची ग्राहकांची मानसिकता नसून, यात मीटर रीडिंगसाठी नेमण्यात आलेल्या खासगी एजन्सीची उदासीनताही थकबाकीसाठी कारणीभूत ठरत आहे. मीटरवरील अचूक आकडेवारी बिलात येत नसल्यामुळे दिवसेंदिवस महावितरणच्या अडचणी वाढत असून, चुकीची मीटर रीडिंग घेणाऱ्या संबंधित एजन्सीवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना महावितरणचे कार्यकारी संचालक एस. डी. शिंदे यांनी दिल्या. 

महावितरणच्या बीड मंडळाची आढावा बैठक सोमवारी (ता.24) पार पडली. यावेळी श्री. शिंदे बोलत होते. यावेळी महावितरणच्या लातूर परिमंडळाचे मुख्य अभियंता राजाराम गरूड, बीडचे अधीक्षक अभियंता रतन सोनुले आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

बीड विभागात गेल्या काही दिवसांपासून चुकीच्या पद्धतीने मीटर रीडिंग घेतली जात असल्याने ग्राहकांच्या तक्रारी वाढत आहेत. त्याचा परिणाम वसुलीवर होत असून, विभागाची थकबाकीचा आकडा फुगत असल्याचे निदर्शनास आले आहे. वितरित केलेल्या विजेचे रूपांतर विक्रीत होणे आवश्‍यक आहे. प्रत्येक युनिटच्या पैशाची नियमितपणे वसुली करून वीजगळती थांबविण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांवर आहे. एजन्सीकडून अचूक मीटर वाचन झाल्यास त्याचा फायदा होणार असून, ग्राहकांचे समाधानही केले जाणार आहे. याकरिता उपविभागीय अधिकारी, सहायक अभियंता यांनी लेखा विभागातील अधिकाऱ्यांनी क्रॉस चेकिंग करणे गरजेचे आहे. यामध्ये तफावत आढळून आल्यास कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी बीडचे अधीक्षक अभियंता रतन सोनुले यांना दिल्या आहेत.

Web Title: Take action on an incorrect meter reading agency

टॅग्स