ऑलिने विमा घ्या; आष्टीत रास्ता रोको

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जुलै 2018

आष्टी (जि. बीड) : पंतप्रधान पिकविमा योजनेअंतर्गत खरीप हंगामासाठी आपले सरकार केंद्राचे सर्व्हर डाऊन असल्याने ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी शेतकर्यांना केंद्रांत हेलपाटे मारावे लागत आहेत. बँकांही पिकविमा भरण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना हुसकावून लावत असल्याने शेतकऱ्यांची सुरू असलेली ससेहोलपट थांबवावी, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी शनिवारी (ता. 21) येथील नगर-बीड महामार्गावर अण्णाभाऊ साठे चौकात रास्ता रोको आंदोलन केले.

ऑनलाईन पिकविमा भरण्यासाठी सर्व्हरची युद्धपातळीवर दुरूस्ती करून पुरेशा क्षमतेने दररोज एका केंद्रामध्ये किमान 200 ते 300 अर्ज शेतकऱ्यांना भरता येतील अशी व्यवस्था करावी, तसेच कर्जदार शेतकऱ्यांचे पिकविमा अर्ज भरून घेण्याच्या बँकांना तातडीने सूचना द्याव्यात अथवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज घेण्याच्या सूचना आपले सरकार सेवा केंद्र व बँकांना द्याव्यात, अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राम खाडे यांनी यावेळी केली.

Web Title: Take Olene Insurance, farmers protest on road