'एपीआय'सह हवालदार लाचेच्या जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 नोव्हेंबर 2018

नांदेड : गंभीर गुन्ह्यातील कलम कमी करण्यासाठी व पोलिस कोठडीत आरोपीला चांगली वागणूक देण्यासाठी 25 हजारांची लाच मागणारे सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय) सुनील लहाणे व हवालदार केशव हाके हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकले. ही कारवाई शिवाजीनगर ठाण्यात बुधवारी (ता. २१) दुपारी दोन वाजता केली. 

देगलूर नाका परिसरातील वाल्मिकीनगरमधील तक्रारदाराच्या भावावर शिवाजीनगर ठाण्यात प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. पोलिस निरीक्षक सुट्टीवर असल्याने पोलिस ठाण्याच पदभार हा एपीआय सुनील लहाणे यांच्याकडे होता. त्यांनी या काळात हा गुन्हा दाखल केला. तक्रारदाराकडून अटक केलेल्या आरोपीला चांगली वागणूक देतो. तसेच कलम ३०७ बदलून ३२४ करण्यासाठी ५० हजारांची लाच मागितली. तडजोडअंती ही लाच 25 हजार देण्याचे ठरले. मात्र, ही लाच देण्याची इच्छा नसलेल्या तक्रारदाराने एसीबी कार्यालयात तक्रार दाखल केली.

या तक्रारीवरून एसीबीच्या पथकांनी 16 नोव्हेंबरला लाचेच्या मागणीची पडताळणी केली. यामध्ये मागणी केल्याचे सिद्ध झाल्याने बुधवारी (ता. २१) दुपारी एपीआय सुनील लहाणे आणि त्यांचा मदतनीस हवालदार केशव हाके यांना शिवाजीनगर ठाण्यातून अटक केली. त्यांच्याविरूध्द शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title: Taking Bribe Constable arrested with API in Nanded