साडेचार हजारांची लाच घेणारा तलाठी जाळ्यात

प्रल्हाद कांबळे
शुक्रवार, 28 डिसेंबर 2018

नांदेड : शेताचा फेरफार करण्यासाठी साडेचार हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या तलाठ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. लाचखोर तलाठी बालाजी पन्नमवार हा हरडप (ता. हदगाव) सज्जाचा होता.

नांदेड : शेताचा फेरफार करण्यासाठी साडेचार हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या तलाठ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. लाचखोर तलाठी बालाजी पन्नमवार हा हरडप (ता. हदगाव) सज्जाचा होता.

हदगाव तालुक्यातील हरडप सज्जाचा तलाठी बालाजी व्यंकटराव पन्नमवार (वय ५२) याच्याकडे शासकिय सेवेत असलेला एक तक्रारदार वडिलोपार्जित शेती ही वडिलाच्या नावे फेरफार करण्यासाठी गेला होता. परंतु या कामासाठी लाचखोर तलाठी बालाजी पन्नमवार याने साडेचार हजार रुपयांची लाच मागितली. परंतु ही लाच देण्याची इच्छा नसलेल्या तक्रारदाराने नांदेड येथे येऊन एसीबी कार्यालयात तक्रार दिली. या तक्रारीच्या आधारे एसीबीच्या पथकाने तलाठी सज्जा हरडप येथे शुक्रवारी (ता. २८) दुपारी सापळा लावून पडताळणी केली. परंतु याच सापळ्यात लगेच साडेचार हजारांची लाच स्वीकारताना बालाजी पन्नमवार याला रंगहाथ पकडले. लाचखोर तलाठी बालाजी पन्नमवार याच्याविरोधात हदगाव ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दरम्यान, सदरची कारवाई पोलिस उपअधीक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बळवंत पेडगावकर, कर्मचारी बाबू गाजूलवार, एकनाथ गंगातिर्थ, सुरेश गाडेकर, अनिल कदम यांनी केली.

Web Title: Talathi Captured for accepting bribe of Rs four thousand and five hundred