दोन दिवसांपुर्वी वडिलांचे निधन झाले अन्...काल पोरगा परत आमदार झाला

मंगेश शेवाळकर
शुक्रवार, 25 ऑक्टोबर 2019

आज बाबा असते तर....
या वाक्याने आमदार मुटकुळेंसह उपस्थित भावूकआज बाबा असते तर....
या वाक्याने आमदार मुटकुळेंसह उपस्थित भावूक

हिंगोली : दोन दिवसांपुर्वीच वडिलांचे निधन झाल्याचे दुःख असतांनाही निवडणुकीच्या मतमोजणीसाठी आलेल्या आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्या विजयाची घोषणा झाली अन त्यावेळी आज बाबा असते तर असे वाक्य त्यांच्या तोंडून बाहेर पडले. एकीकडे वडिलांच्या निधनाचे दुःख अन दुसरीकडे विजयाचा आनंद या पाहतांना उपस्थितही भावून होऊन गेले. 

हिंगोली तालुक्यातील आडगाव मुटकुळे येथील सखारामजी मुटकुळे (वय ७८) हे सामाजिक क्षेत्रातील दबदबा असलेले नाव आहे. ग्रामीण भागातून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी यासाठी मुटकुळे यांनी भांडेगाव येथे सुखदेवानंद विद्यालयाच्या स्थापनेसाठी मोठा सहभाग घेतला होता. या शिवाय इतर सामाजिक कार्यामधेही अग्रेसर असे व्यक्तीमत्व म्हणून त्यांची ओळख होती. मागील काही दिवसांपासून वृध्दापकाळामुळे ते आजारी होते.  

दरम्यान, त्यांचा मुलगा भाजपाचे आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी मागील वेळी विधानसभा निवडणुकीत यश मिळविले. पाच वर्षात विकासाच्या जोरावर त्यांनी यावेळीही निवडणुक लढवली. मतदार संघातील प्रत्येक गावात मतदारांच्या भेटी घेऊन रात्री उशीर झाल्यानंतरही त्यांनी दररोज घरी जाऊन वडिलांच्या प्रकृतीची चौकशी 
केली. मतदारांचा कसा प्रतिसाद आहे, प्रचार कसा चालू आहे याची माहितीही सखारामजी मुटकुळे घेत होते. प्रत्यक्ष मतदान झाल्यानंतरही त्यांनी आमदार मुटकुळे यांच्याकडून माहिती घेतली. मात्र मतमोजणीला दोन दिवस शिल्लक असतांना मंगळवारी (ता.२२) सकाळी सखारामजी मुटकुळे यांचा मृत्यू झाला.

गुरुवारी (ता.२४) मतमोजणी झाल्यानंतर आमदार मुटकुळे विजयी झाल्याची घोषणा झाली. यावेळी आमदार मुटकुळे यांनी आज बाबा असते तर असे वाक्य उच्चारत त्यांच्या डोळ्यातून आश्रू वाहू लागले. त्यांच्या या वाक्याने उपस्थित देखील भावूक झाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tanhaji Mutkule Selected as MLA On BJP seat in Hingoli district