महापालिकेच्या झोन सातमध्ये होणार चुरस

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 ऑक्टोबर 2016

सरोज मसलगे पाटील, अंजली वडजे पाटील यांनी दाखल केली उमेदवारी

औरंगाबाद - तनिष्का निवडणुकीसाठी महापालिकेच्या झोन क्रमांक सातमध्ये दोनजणी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. दोन उमेदवारांची लढत चुरशीची होणार आहे. सरोज मसलगे पाटील व अंजली वडजे पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. 

सरोज मसलगे पाटील, अंजली वडजे पाटील यांनी दाखल केली उमेदवारी

औरंगाबाद - तनिष्का निवडणुकीसाठी महापालिकेच्या झोन क्रमांक सातमध्ये दोनजणी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. दोन उमेदवारांची लढत चुरशीची होणार आहे. सरोज मसलगे पाटील व अंजली वडजे पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. 

तनिष्का निवडणुकीसाठी झोन सातमधून उमेदवारी दाखल केलेल्या सरोज मसलगे पाटील या महिला तक्रार निवारण केंद्राद्वारे सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी तक्रार निवारण केंद्राच्या माध्यमातून अनेक महिला, मुलींचे समुपदेशन केले आहे. अनाथ व एचआयव्ही बाधितांसाठी त्या मदत करीत आहेत. दोन अनाथ मुलांना त्यांनी दत्तक घेतले असून, दोन गरीब मुलींचे विवाहही लावले आहेत. तीनशे बचतगट स्थापून बेराजगार महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. शहरातील रस्ते, वीज, पाणी, पायाभूत सुविधा आदी प्रश्‍नांसाठी त्या लढणार आहेत. अंजली वडजे पाटील या सामाजिक प्रश्‍नांसंबंधी संवेदनशील असून, त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. महिलांच्या समस्या, त्यांच्यात जागरुकता निर्माण करण्यासाठी श्रीमती वडजे प्रयत्नशील आहेत. महापालिकेच्या झोन सातमध्ये तेरा वॉर्ड असून, इंदिरानगर (दक्षिण) बायजीपुरा, जवाहर कॉलनी, विद्यानगर, पुंडलिकनगर, गजानननगर, गारखेडा, बालकृष्णनगर, शिवनेरी कॉलनी, रामकृष्णनगर, काबरानगर, उल्कानगरी, जयविश्‍वभारती कॉलनी, शिवाजीनगर, भारतनगर वॉर्डांचा यात समावेश आहे. 

तनिष्काच्या माध्यमातून महिलांच्या समस्यांची उकल होत असून, त्यांना सन्मान मिळत आहे. याद्वारे आपण महिलांना रोजगार, त्यांच्या समस्यांवर सक्रियपणे काम करायचे आहे. 
- सरोज मसलगे पाटील, उमेदवार 

तनिष्काच्या माध्यमातून सुरू असलेल्या उपक्रमातून महिलांना व्यासपीठ तयार झाले आहे. त्यांना प्रत्यक्ष काम करण्याची संधी निर्माण झाली असून, विविध प्रश्‍नांवर काम करायचे आहे.
- अंजली वडजे पाटील, उमेदवार 

Web Title: tanishka election in aurangabad

टॅग्स