तनिष्कांत निवडणुकीचा उत्साह अन्‌ मतदारांत कमालीची उत्सुकता!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 ऑक्टोबर 2016

औरंगाबाद - ‘तनिष्का’ व्यासपीठातर्फे नेतृत्व विकास कार्यक्रमांतर्गत येत्या १५ व १६ ऑक्‍टोबरला होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवार महिलांमध्ये प्रचंड उत्साह, तर मतदारांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.

उमेदवारीसाठीही महिला मोठ्या संख्येने पुढे आल्या आहेत, येत आहेत. निवडणूक आता जवळ येऊन ठेपल्याने गाठीभेटी, छोटेखानी बैठकांतून केला जाणारा प्रचार शिगेला पोहचला आहे. या आगळ्या निवडणुकीची शहरांपासून ग्रामीण भागापर्यंत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. 

‘सकाळ माध्यम समूहा’च्या तनिष्का स्त्रीप्रतिष्ठा अभियानांतर्गत महिलांना नेतृत्वासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. या व्यासपीठाच्या माध्यमातून तनिष्कांनी राज्यात वेगवेगळ्या स्वरूपाचे कार्य उभारणीसह जागृतीत मोठा वाटा उचलला आहे. आता नेतृत्व विकास कार्यक्रमांतर्गत राज्यभरात तनिष्का निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.

या निवडणुकीचे बिगुल नुकतेच वाजले आणि मराठवाड्यात या आगळ्या निवडणुकीची चर्चा सुरू झाली. शहरांपासून गावपातळीपर्यंत उमेदवारीसाठी महिल्या सरसावल्या. अनेक महिलांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर प्रचाराला सुरवातही केली. आदिशक्तीचा उत्सव असलेल्या नवरात्रोत्सवात झालेल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांत त्यांनी भूमिका मांडली व मतदानाचे आवाहन केले. अनेक महिला कोपरा बैठकी, तर काही चक्क छोटेखानी रॅली काढून प्रचार करीत आहेत. उमेदवारीसाठी अजूनही अनेक महिला पुढे येत असून त्यांना संधी दिली जात आहे. महिलांनीच महिलांसाठी मतदान करायचे असल्याने मतदारांतही कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. ‘महिलांमधील नेतृत्वगुण विकसित होण्यासाठी ‘तनिष्का’ हे एक उत्तम व्यासपीठ आहे. या व्यासपीठाच्या माध्यमातून महिलाही महिलांचे प्रश्‍न सोडवू शकतात. पुढे जाऊन त्या आत्मविश्‍वासाने विविध क्षेत्रांत आपल्या कार्याचा ठसा उमटवू शकतात,’ असा विश्‍वास उमेदवार महिलांच्या मैत्रिणी, संबंधित ठिकाणचे अन्य मान्यवर व्यक्त करीत आहेत. औरंगाबाद, बीड, जालना शहर व जिल्ह्यांत या निवडणुकीबद्दल मोठी उत्सुकता असून बहुतांश केंद्रांत उमेदवारांत चुरस निर्माण झाली आहे. १५ व १६ ऑक्‍टोबरला मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर संबंधित केंद्रांत कुणी बाजी मारली, हे कळणार आहे.

औरंगाबाद शहरात उत्सुकता शिगेला
मतदानासाठीचे औरंगाबाद शहरातील उमेदवारांना दिलेले टाेलफ्री क्रमांक
औरंगाबाद जिल्ह्यात प्रचाराला वेग
जालना जिल्ह्यात एकजुटीने प्रचार

Web Title: tanishka election in aurangabad

टॅग्स