टँकरच्या धडकेने दुचाकीस्वार ठार 

tanker andTwo wheelers accident one killed
tanker andTwo wheelers accident one killed

नागपूर : टँकरची धडक बसल्याने सुकळी कलार येथील विनोद मधुकर लोखंडे (32)  या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. घटनेच्या वेळी विनोद लोखंडे हे त्यांची बहिण आणि मुलामुलीसह जात होते. सुकळी कलार रोडने जात असताना (एमएच 14 बीजे 2194) क्रमांकाच्या टँकरचालकाने त्यांना समोरून धडक दिली. या अपघातात विनोदचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

धडक दिल्यानंतर टँकरचालकाने घटनास्थळी आपले वाहन सोडून पळ काढला. याप्रकरणी पोलिसांनी अपघाताचा गुन्हा नोंदवून टँकरचालक विलग्रेड अलीवर राव (43) राव ले आऊट, वडधामना यास अटक केली.

पादचाऱ्याला चिरडले 

रस्ता ओलांडून जाणाऱ्या एका पादचाऱ्याला एका अज्ञात चारचाकी वाहनचालकाने धडक देऊन जागीच चिरडल्याची घटना कोराडी हद्दीत बडवाईक बिल्डींगसमोर घडली. 
रामाजी तुकाराम उईके (55) रा. आंबेडकरनगर, बेझनबाग असे मृतकाचे नाव आहे. 
बुधवारी रात्री 8.15 च्या सुमारास मृत रामाजी हे घटनास्थळाहून रस्ता ओलांडून जात असताना चारचाकीच्या वाहनचालकाने त्यांना धडक देऊन जागीच चिरडले. याप्रकरणी कोराडी पोलिसांनी अपघाताचा गुन्हा नोंदविला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com