औरंगाबाद रस्त्यावर पेट्रोल घेऊन जाणारा टँकर उलटला 

बाळासाहेब लोणे
रविवार, 29 सप्टेंबर 2019

वैजापूर-औरंगाबाद रस्त्यावर पेट्रोल टँकर उलटल्याची घटना घडली. सुदैवाने पेट्रोलची गळती कमी झाल्याने टँकरला आग लागली नाही.

गंगापूर : वैजापूर-औरंगाबादच्या दिशेने पेट्रोल घेऊन जाणारा टँकर शनिवारी (ता. 28) पलटी झाला. येथील रस्त्याचे काम सुरू असल्याने अर्धा रस्ता खोदण्यात आला आहे. अंदाज न आल्याने एकाच दिशेला जाऊन रस्त्याच्या खाली पेट्रोल टँकर उलटल्याची घटना घडली. सुदैवाने पेट्रोलची गळती कमी झाल्याने टँकरला आग लागली नाही. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. 

दरम्यान, यावेळी शेकडो लिटर पेट्राेल रस्त्याच्या कामात साचलेल्या पाण्यात पडल्याने पेट्रोलचा वास सुटला होता. यावेळी पोलिस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेऊन औरंगाबादकडे जाणारी-येणारी वाहतूक बंद  केली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ट्राफिक जाम झाली होती. पोलिसांनी अग्निशामक यंत्रणेला देखील पाचारण केले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A tanker carrying petrol was reversed on Aurangabad road