टॅंकरच्या वाढत्या आलेखाला किंचित "ब्रेक'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 जून 2016

औरंगाबाद - मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे टंचाईग्रस्त भागातील टॅंकरच्या वाढत्या संख्येला किंचितसा ब्रेक लागला आहे. बीड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांत टॅंकरची संख्या घटली असून, एकूण 80 टॅंकर बंद झाले आहेत. 

गेल्या वर्षी जून ते ऑक्‍टोबर या कालावधीत सरासरीपेक्षाही कमी पाऊस मराठवाड्यात झाला. परिणामी ऑक्‍टोबर-नोव्हेंबरपासूनच अनेक तालुक्‍यांत टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला. 10 जून 2016 पर्यंत मराठवाड्यातील 2972 गावे व 1017 वाड्यांना 4015 टॅंकरने पाणीपुरवठा होत होता. आठवडाभरात नांदेड, बीड, लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांत चांगला पाऊस झाला. जलयुक्‍त शिवार अभियानात खोलीकरण झालेल्या अनेक प्रकल्प, तलाव आणि नदीनाल्यांमध्ये पाणी आले. दमदार पाऊस झालेल्या गावांना सुरू असलेले टॅंकर बंद झाले. 

80 टॅंकर बंद अन्‌ 33 सुरू 

बीड, लातूर आणि उस्मानाबादमधील एकूण 80 टॅंकर बंद झाले, तर पाणीटंचाईमुळे उर्वरित पाच जिल्ह्यांत आठवडाभरात 33 टॅंकर वाढले. बीड जिल्ह्यात 59 टॅंकर, लातूरमध्ये 10 आणि उस्मानाबादेतील 11 टॅंकर कमी झाले, तर औरंगाबाद जिल्ह्यात 9, जालन्यात 14, परभणीत 3, नांदेडमध्ये 7 टॅंकर वाढले आहेत. सध्या मराठवाड्यातील 2935 गावे, 977 वाड्यांसाठी 3968 टॅंकर सुरू आहेत.

Web Title: Tankers slightly rising graph "break"