तपोवन एक्स्प्रेसच्या ब्रेकमध्ये धूर निघाल्याने खळबळ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 एप्रिल 2018

मुंबई-नांदेड तपोवन एक्सप्रेसच्या पँट्रीकारचे ब्रेक लाईनर जाम झाल्यामुळे दौलताबाद रेल्वे स्टेशनवर धूर निघाल्याने प्रवासात घबराट निर्माण झाली. त्यामुळे सुमारे वीस मिनिटे गाडी थांबवण्यात आली.

औरंगाबाद : मुंबई-नांदेड तपोवन एक्सप्रेसच्या पँट्रीकारचे ब्रेक लाईनर जाम झाल्यामुळे दौलताबाद रेल्वे स्टेशनवर धूर निघाल्याने प्रवासात घबराट निर्माण झाली. त्यामुळे सुमारे वीस मिनिटे गाडी थांबवण्यात आली.

गाडी हळूहळू गाडी औरंगाबाद स्टेशनपर्यंत आणण्यात आली. त्यानंतर औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर त्याची दुरुस्ती करण्यात आली आहे. टिक्सार विभागाचे अभियंता कुणाल रत्नपारखी आणि जानी कादर यांनी दुरुस्ती केली. तरूर रेल्वे स्टेशनवरून गाड़ी जाताना एका प्रवाशाने हा प्रकार पाहिला. त्यांनी दिलेल्या माहितीवरून रेल्वे प्रवासी सेनेच्या अध्यक्ष संतोष कुमार सोमानी यांनी औरंगाबादला स्टेशनला माहिती दिली. तांत्रिक कर्मचारी आणि यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती, औरंगाबादला गाडी दहा मिनिटात दुरुस्त होऊन पुढे रवाना झाली.

Web Title: Tapovan Express Break Damages Peoples Afraid