तौसिफला न्याय मिळाला पाहिजे!

लातूर - तौसिफ शेख या युवकाला न्याय मिळावा यासाठी गांधी चौक येथे सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन गुरुवारी मूक निदर्शने केली.
लातूर - तौसिफ शेख या युवकाला न्याय मिळावा यासाठी गांधी चौक येथे सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन गुरुवारी मूक निदर्शने केली.

लातूर - सामाजिक न्यायासाठी तौसिफ शेख या चळवळीतील युवकाने प्राणाची आहुती दिली. त्याची ही आत्महत्या नसून शासकीय हत्याच होती. तौसिफला न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी मुस्लिम कार्यकर्त्यांनी गुरुवारी येथे केली.

महात्मा गांधी चौकात मुस्लिम कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन मूक निदर्शने केली. या वेळी तौसिफला न्याय मिळाला पाहिजे, असे लिहिलेले वेगवेगळे फलकही कार्यकर्त्यांनी हातात घेतले होते. नगर जिल्ह्यातील कर्जत येथील तौसिफ शेख या युवकाने वक्‍फ मंडळाच्या जागेवरील अतिक्रमण काढण्यासाठी जिवाचे रान केले. या संदर्भात वक्‍फ मंडळाचे अधिकारी, जिल्हाधिकारी यांना वारंवार निवेदने देऊनही सरकारने याबाबत कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे ता. २० डिसेंबरला तौसिफने आत्मदहन केले. याला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी लातुरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी केली. यासोबतच तौसिफ यांच्या कुटुंबातील व्यक्तीस शासकीय नोकरी द्या, ५० लाख रुपयांची आर्थिक मदत करा, राज्यातील वक्‍फ मंडळाच्या जमिनींवरील अतिक्रमण काढा, वक्‍फ जमिनींतून होणाऱ्या उत्पन्नाचा पैसा अल्पसंख्याकांच्या शिक्षणावर खर्च करा अशा मागण्याही करण्यात आल्या.

निदर्शनात मोहसीन शेख, हमीद खान, शादूल शेख, फिरोज शेख, रियाज शेख, रणधीर सुरवसे, गोविंद सिरसाट, हसन शेख, बशीर शेख, जाकिर सय्यद, अन्सार मणियार, याकुब शेख, जब्बार खान, गौस सय्यद आदी सहभागी झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com