जालना पालिकेवर थकीत कराचा डोंगर 

जालना पालिका
जालना पालिका

जालना -  नगरपालिकेची थकीत कराची रक्कम वर्षानुवर्षं वाढत आहे. त्यात यंदाच्या कर वसुलीवर कोरोना इफेक्ट झाल्याचे चित्र आहे. पालिकेला ता.३१ मार्च अखेर ४३ कोटी ८७ लाख ८५ हजार रुपये करापोटी येणे होते. मात्र, मार्च अखेर पालिकेने सात कोटी ७९ लाख ७७ हजार रुपयांची कर वसुली केली आहे. त्यामुळे  ३६ कोटी आठ लाख आठ हजार रुपयांच्या थकीत कराचा डोंगर असल्याने त्याचा पालिकेचे तिजोरीवर परिणाम होणार आहे. 

नगरपालिकेच्या तिजोरीत कराच्या उत्पन्नातून कोट्यवधी रुपये येतात. या उत्पन्नातून नगरपालिका शहरात विविध विकास कामे केली जातात. मात्र, जालना नगरपालिकेची करवसुली वर्षानुवर्ष थकीत राहत आहे. त्यामुळे थकीत कराच्या रक्कमेमुळे पालिकेच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे. 

गतवर्षापर्यंत पाकिलेच्या थकीत कराची रक्कम १४ कोटी ५५ लाख ५३ हजार होती. त्यात यंदा मार्च अखेर पालिकेला करापोटी २९ कोटी ३२ लाख ३२ हजार रुपयांचे उत्पन्न मिळणार होते. त्यामुळे मागील थकीत कराचे आणि चालू कराचे मिळून मार्च अखेर ४३ कोटी ८७ लाख ८५ हजार रुपयांचा कर जालनेकरांकडून पालिकेला वसूल करणे होते. 
मात्र, जालनेकरांनी दरवर्षी प्रमाणे कर भरणा करण्याकडे दुर्लक्ष केले आहेत. त्यात कोरोनाचा इफेक्टही कर वसुलीला मारक ठरला आहे.

त्यामुळे मार्च अखेर नगरपालिकेने सात कोटी ७९ लाख ७७ हजार रुपयांचा कर वसूल केला आहे. 
यात मागील थकीत करापोटी दोन कोटी ७५ लाख १८ हजार रुपयांचा कर वसूल करण्यात आला आहे. तर चालू करापैकी पाच कोटी चार लाख ५९ हजार रुपयांचा कर वसूल करण्यात आला आहे. मात्र, यंदा नगरपालिकेचा मार्च एंड ३६ कोटी आठ लाख आठ हजार रुपयांच्या थकीत कराने झाला आहे. 

कोरोनाचा परिणाम 

नगरपालिकेची कर वसुली ही मार्चएन्ड जवळ आला की अधिक होते. मात्र , यंदा कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी ता.२२ मार्चपासून संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्यामुळे कर वसुलीवर कोरोनाचा परिणाम जाणवला आहे, यात शंका नाही. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com