पडेगावातील चुकीचा "टीडीआर' रद्द

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 जानेवारी 2017

औरंगाबाद - नगररचना विभागाने पडेगाव येथील एका जागेच्या प्रकरणात चुकीचा "टीडीआर' दिल्याचे तब्बल तीन वर्षांनंतर उघड झाले. याविषयी प्राप्त तक्रारींच्या आधारे आयुक्‍त ओमप्रकाश बकोरिया यांनी टीडीआर रद्द केला. त्यानंतर बुधवारी (ता.25) नगररचना विभागाचे प्रभारी सहायक संचालक ए. बी. देशमुख यांनी "टीडीआर'धारक संजय गोपाल सिकची यांना देण्यात आलेला चुकीचा टीडीआर रद्द करण्यात आल्याचे पत्र देऊन नजरचुकीने देण्यात आलेले टीडीआर प्रमाणपत्र जमा करण्याचा आदेश दिला आहे.

या प्रकरणी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार : टीडीआरधारक संजय सिकची यांनी या जमिनीवर टीडीआर घेतला. तेवढीच जमीन त्यांनी शिवनारायण प्रसाद यांच्याकडून (मुखत्यारे आम हुसैनखान अलीयारखान यांच्यामार्फत) 10 लाखांत खरेदी केली होती. खरेदीच्या पाचव्याच दिवशी ती टीडीआर घेण्यासाठी महापालिकेला विकली. श्री. सिकची यांच्या खरेदीखतात व महापालिकेच्या खरेदीखतात ही जागा 15 मीटर रस्त्यावरची असल्याचे दाखविण्यात आले होते. महापालिकेला खरेदीखत करून देताना श्री. सिकची यांनी त्यात दुसऱ्याच्या गटातील 24 मीटर रस्त्यावरील 800 चौरस मीटर रस्त्याचाही गरज नसताना उल्लेख केला आहे. गट नंबर 71 मधल्या 800 चौरस मीटर या जागेतून 24 मीटरचा रस्ता जातो, असे सांगत 26 एप्रिल 2013 ला टीडीआर मिळविला. गट नंबर 71 च्या 7/12 वर आजही श्री. सिकची यांचे नाव नसताना त्यांच्या नावाचा सातबारा, भूमी अभिलेखचा नकाशा जोडल्याचे म्हणत नगररचना विभागाने ही फाईल तयार केली. प्रत्यक्षात भूमी अभिलेखचा मोजणी नकाशाही चुकीचा होता आणि सूत्रांच्या म्हणण्यानुसार आजही श्री. सिकची यांचे 7/12 वर नाव नाही, असे सूत्रांनी सांगितले; तसेच या जागेचा कसलाही वाद न्यायप्रविष्ट नसताना केवळ आधार घेता यावा म्हणून विधी विभागाचा अभिप्राय मागविण्यात आला. 15 मीटरऐवजी 24 मीटर रस्त्यावरील टीडीआर असल्याचे प्रमाणपत्रात म्हटले आहे. या संदर्भात तक्रारी प्राप्त झाल्यानंतर तपासणी करून आयुक्‍त श्री. बकोरिया यांनी सोमवारी (ता. 16) हा टीडीआर रद्द करण्याचे आदेश दिले. त्यानुसार प्रभारी सहायक संचालक श्री. देशमुख यांनी बुधवारी (ता. 25) संजय सिकची यांना लेखी पत्र देऊन ते टीडीआर प्रमाणपत्र जमा करण्याचे आदेश दिले आहेत. सिकची यांनीच 24 मीटर रस्त्यावर टीडीआर मागितलेला होता, त्याचा नकाशा आराखड्याशी सुसंगत नसल्याने हा टीडीआर नजरचुकीने देण्यात आल्याचे म्हटले आहे.

Web Title: TDR canceled