शिक्षीकेने काढले बोगस प्रमाणपत्राचे वाभाडे - काय आहे प्रकरण वाचा 

नवनाथ येवले
Tuesday, 3 March 2020

दिव्यांगाच्या बोगस प्रमाणपत्राची जिल्हारुग्णालयाच्या डॉक्टरांनी पुष्टी दिल्याचा दावा करत सहशिक्षीका महानंदा पवळे यांनी बदली प्रक्रीयेत बोगस प्रमाणपत्र सादर करुन सोईच्या ठिकाणी समायोजन करून घेणाऱ्या दोषी शिक्षिकेवर कारवाई करुन समायोजन रद्द करण्याच्या मागणीसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांच्या दालनासमोरच ठिय्या मांडला.

नांदेड : ऑनलाइन शिक्षक बदली प्रक्रीयेचा सोईनुसार लाभ घेण्यासाठी दिव्यांगच्या बोगस प्रमाणपत्राचे प्रकरण मंगळवारी ता.३ २०२० पुन्हा चव्हाट्यावर आले. दिव्यांगाच्या बोगस प्रमाणपत्राची जिल्हारुग्णालयाच्या डॉक्टरांनी पुष्टी दिल्याचा दावा करत सहशिक्षीका महानंदा पवळे यांनी बदली प्रक्रीयेत बोगस प्रमाणपत्र सादर करुन सोईच्या ठिकाणी समायोजन करून घेणाऱ्या दोषी शिक्षिकेवर कारवाई करुन समायोजन रद्द करण्याच्या मागणीसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांच्या दालनासमोरच ठिय्या मांडला.

शासनाच्या ऑनालाइन शिक्षक बदली प्रक्रीयेनुसार सोईच्या ठिकाणी बदली करुन घेण्यासाठी संवर्ग दोन मधे अनेक शिक्षक उमेदवारांनी दिव्यांगाचे बोगस प्रमाणपत्र सादर केले. सेवाज्येष्ठतेनुसार खो बसल्याने अनेक शिक्षकांना अतिरिक्त व्हावे लागले. त्यातच संवर्ग दोनमधील उमेदवारांनी अधिक प्रमाणात बोगस प्रमाणपत्र सादर केल्याचा सुर शिक्षक संघटनांकडून उमटला होता. त्यानुसार शासन निर्देशानुसार जिल्हा परिषद स्तरावर विस्थापित शिक्षकांना रॅंडम राऊंडनुसार रिक्त पदांवर नियुक्त्या करण्यात आल्या. मात्र, बदलीस पात्र शिक्षकांना खो देणाऱ्या अनेक उमेदवारांनी दिव्यांगाचे बोगस प्रमाणपत्र सादर केल्याचे प्रकार समोर आल्याने खो बसलेल्या शिक्षकांचे चुकीचे समायोजन झाले. 

हेही वाचा- Video and Photos : ‘सकाळ’वर शुभेच्छांचा वर्षाव

बोगस प्रमाणपत्राचा निष्कर्ष
जिल्हा परिषद शाळा जुना कौठा येथे सप्टेंबर २०१९ मध्ये कार्यरत शिक्षिका महानंदा पवळे यांचे (ता.१८) सप्टेंबर २०१९ रोजी केंद्रिय प्राथमिक कन्या शाळा हिमायतनगर येथे बदली प्रक्रीयेने समायोजन झाले. सेवा ज्येष्ठतेनुसार कौठा येथील शाळेतील शिक्षिका ज्योती शंकरराव गंगमवार यांची बदली होणे किंवा त्यांचे समायोजन होणे आवश्यक होते.

शासन नियमाप्रमाणे गंगमवार यांचे समायोजन होणे अपेक्षित असतानाही गंगमवार यांनी कर्णबधिर असल्याचे बोगस प्रमाणपत्र दाखल करून समायोजन टाळले. त्यामुळे पवळे महानंदा यांचे जिल्हा परिषद शाळा जुना कौठा येथून केंद्रीय प्राथमिक कन्या शाळा येथे समायोजन करण्यात आले. बोगस प्रमाणपत्र जोडणाऱ्या ज्योती गंगमवार यांचे दिव्यांगाचे प्रमाणपत्र बोगस असल्याचा निष्कर्ष डॉ.शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरीच्या संबंधित डॉक्टरांनी लेखी नोंदविला आहे.

येथे क्लिक कराधुळीवंदनासाठी ‘हा’ वृक्ष सज्ज

आंदोलन सुरुच ठेवणार
डॉक्टरांचा हा अहवाल जिल्हा परिषदेत सादर करूनही पवळे यांचे समायोजन रद्द करून त्यांची मुळठिकानी नियुक्ती करण्यात आली नाही. दिव्यांगाचे बोगस प्रमाणप सादर करुन शासनाची दिशाभूल, फसवणूक करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करुन समायोजन रद्द करून मुळजागी पदस्थापनेच्या मागणीसाठी सहशिक्षिका महानंदा पवळे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. दरम्यान सौ. पवळे यांच्या आंदोलनामुळे शिक्षण विभागाची चांगलीच तारांबळ उडाली. ठोस कारवाईशिवाय आंदोलन सुरूच ठेवण्याची भावना आंदोलनकर्त्या सौ. पवळे यांनी या वेळी व्यक्त केल्या. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Teacher Removes Bogus Certificate Deferred - Read the Case What Is,Nanded News