केजमधील वस्तीशाळेतील शिक्षिकेची आत्महत्या

dead_body
dead_body

केज : तालुक्यातील जवळबन येथील वस्तीशाळेवरील शिक्षिका राजश्री व्यंकट मुंडे (वय 40) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (ता. 22) सकाळी उघडकीस आली. घटनेने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. 

राजश्री मुंडे या कवडगाव येथील रहिवासी असून त्या सध्या जवळबन येथील वस्तीशाळेवर शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. दिवसभराचे आपले शाळेवरील कर्तव्य पार पाडून त्या नित्याप्रमाणे घरी निघून गेला होत्या. मात्र त्या घरी न जाता गुरुवारी सायंकाळपासून बेपत्ता झाल्या होत्या. त्यामुळे नातेवाईकांनी सर्वत्र शोधाशोध केली असता बोरीसावरगाव शिवारातील एका लिंबाच्या झाडास राजश्री मुंडे या वस्तीशाळा शिक्षिकेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले आहे.

गुरूवारी रात्री उशीराने त्यांनी गळफास घेतला असल्याचा संशय आहे. घटनेची माहिती मिळताच युसुफ वडगाव पोलिसांनी घटनास्थळी पोचून पंचनामा करून मृतदेह उच्चस्तरीय तपासणीसाठी बनसारोळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला आहे. अद्याप राजश्री मुंडे यांनी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे समजू शकले नाही. विद्यार्थीप्रिय शिक्षिकेच्या आत्महत्येमुळे तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com