अठराशे रुपयांची लाच घेणारा शिक्षक एसीबीच्या जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 जून 2018

शालेय पोषण आहाराचे बिल ऑनलाईन भरल्याबद्दल व पुढील बिल भरण्यासाठी अठराशे रुपयांची लाच घेणाऱ्या भोकरमधील नवी आबादी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक गणेश साहेबराव जाधव यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. 

नांदेड : शालेय पोषण आहाराचे बिल ऑनलाईन भरल्याबद्दल व पुढील बिल भरण्यासाठी अठराशे रुपयांची लाच घेणाऱ्या भोकरमधील नवी आबादी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक गणेश साहेबराव जाधव यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. 

गणेश जाधव या शिक्षकास शुक्रवारी (ता. २९) पकडण्यात आले. शालेय पोषण आहार योजनेंतर्गत खिचडी शिजविणाऱ्या महिलेच्या पतीने नांदेड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सोमवारी (ता. २५) तक्रार केली होती. याप्रकरणी शिक्षकाविरुध्द भोकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: The teacher taking a bribe of Rs 1800