शिक्षकाच्या पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 नोव्हेंबर 2019

शिक्षकाच्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (ता.20) सकाळी दहाच्या सुमारास पाचोड येथील शिवाजीनगर (ता.पैठण) भागात घडली. येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक दीपक साळवे हे पत्नी शीतल व एक तीनवर्षीय मुलीसह येथील शिवाजीनगर भागात वास्तव्यास आहे.

पाचोड (जि.औरंगाबाद ) ः शिक्षकाच्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी (ता.20) सकाळी दहाच्या सुमारास पाचोड येथील शिवाजीनगर (ता.पैठण) भागात घडली. येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक दीपक साळवे हे पत्नी शीतल व एक तीनवर्षीय मुलीसह येथील शिवाजीनगर भागात वास्तव्यास आहे.

बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास काही कामानिमित्त ते घराबाहेर पडले असता त्यांच्या पत्नी शीतलने घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. काही वेळाने पती दीपक साळवे घरी आले असता त्यांना पत्नीने गळफास घेतल्याचे दिसून आले. या घटनेची पोलिसांना माहिती मिळताच बीट अंमलदार सुधाकर मोहिते यांनी त्यांच्या सहकाऱ्यासह घटनास्थळी धाव घेतली व उपस्थित रहिवाशांच्या मदतीने छताला लटकलेला मृतदेह खाली घेतला. त्यानंतर शीतलचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्याने तीस तपासून मृत घोषित केले.

हेही वाचा - आधी कलेसाठी झिजले आता मानधनासाठी पायपीट !

जमादार सुधाकर मोहिते यांनी पाहणी करून घटनास्थळाचा पंचनामा केला. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. मृत शीतल यांना एक तीनवर्षीय मुलगी आहे. एकंदरीत या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची पाचोड पोलिस ठाण्यात आकस्मिक नोंद करण्यात आली असून, तपास सहायक पोलिस निरीक्षक अतुल येरमे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अमलदार सुधाकर मोहिते करीत आहेत.

 

कर्जबाजारी शेतकऱ्याची पैठण तालुक्‍यात आत्महत्या

पैठण (जि.औरंगाबाद) : कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्याने लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना मायगाव (ता. पैठण) येथे मंगळवारी (ता. 19) घडली. बापूराव अंकुश दसपुते (वय 54) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. तहसील, पोलिस व कृषी विभागाच्या संयुक्त पथकाने बुधवारी (ता. 20) घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

पोलिसांनी सांगितले, की शेतात पाणी देण्यासाठी जातो, असे सांगून या शेतकऱ्याने शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. पोलिस पाटील दादासाहेब दसपुते यांनी पैठण पोलिस ठाण्यास घटनेची माहिती दिली. पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार सचीन सानप यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सदर शेतकऱ्याकडे मुलाचे शैक्षणिक कर्ज व एका पतसंस्थेच्या कर्जाची थकबाकी होती. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतीतून उत्पन्न मिळाले नाही. त्यामुळे बॅंकेचे कर्ज फेडू न शकल्याने नैराश्‍यातून शेतकऱ्याने आत्महत्या केली.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Teacher Wife Committed Suicide Paithan