गंगापूर तालुक्यातील तेरा शिक्षकांवर कारवाईची टांगती तलवार

बाळासाहेब लोणे
शनिवार, 4 ऑगस्ट 2018

गंगापूर (औरंगाबाद) : सोयीच्या ठिकाणी बदली व्हावी यासाठी ऑनलाईन प्रक्रिया करताना पोर्टलवर चुकीची माहिती भरणाऱ्या तालुक्यातील बदली
झालेल्या शिक्षकांच्या कागदपत्रांची तपासणी अंतिम  टप्प्यात असून
तालुक्यातील तेरा शिक्षकावर करवाईची टांगती तलवार आहे.

गंगापूर (औरंगाबाद) : सोयीच्या ठिकाणी बदली व्हावी यासाठी ऑनलाईन प्रक्रिया करताना पोर्टलवर चुकीची माहिती भरणाऱ्या तालुक्यातील बदली
झालेल्या शिक्षकांच्या कागदपत्रांची तपासणी अंतिम  टप्प्यात असून
तालुक्यातील तेरा शिक्षकावर करवाईची टांगती तलवार आहे.

प्राथमिक शिक्षणाधिकारी जैस्वाल यांनी यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दोन गावातील अंतर मागविले असून अनेक शिक्षकांनी जोडलेल्या मेडिकल प्रमाणपत्राचीही चौकशी सुरू आहे.  यात सुपडू शिवाजी चौधरी, निर्मला दामोदर वाडेकर, काकासाहेब गंगाधर बाणेदार, मनीषा रंगनाथ गोखले, गीतांजली सुदामराव साळुंखे, ललिता बाबुराव गायके, सुशीला बाजीराव मगर,  दिलीप किसन जाधव, सुनीता नारायण ढवळे, सचिन शेषराव वाखुरे, गायत्री उत्तम परदेशी, तलत सुलताना शेख, रामकृष्ण प्रभाकर बीडवई या शिक्षकांचा समावेश आहे.

ज्या शिक्षकांचे वय ५३ वर्षांच्या वर आहेत, दुर्धर आजाराने त्रस्त आहेत, अंध व अपंग आहेत अशा शिक्षकांनी संवर्ग एक नुसार चुकीची माहिती भरली आहे. पतीपत्नी एकत्रिकरणासाठी अंतर जास्त दाखवून लाभ घेणाऱ्या संवर्ग २ मध्येही हाच प्रकार घडला आहे. तर अन्य संवर्गानुसारही शिक्षकांनी चुकीची माहिती भरल्याची माहिती समोर आली आहे.  शिक्षकांनी दाखल केलेले प्रमाणपत्र बोगस असल्याचे समोर आल्यास त्या शिक्षकांच्या बदल्या अपात्र ठरविल्या जाणार आहेत. अपात्र शिक्षकांच्या कारवाईचा प्रस्ताव शिक्षण विभाग मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर करणार आहे.

 विस्थापित शिक्षकांची नियुक्ती व्हावी 
ऑनलाईन बदली करताना संवर्ग १ व २ मधील शिक्षकांना प्राधान्य दिले गेले. त्याचा लाभ शिक्षकांनी  घेतला. परंतु, त्यांच्यामुळे गैसोय झालेल्या
शिक्षकांनी बदली प्रक्रियेवर अक्षेप घेत तक्रारी केल्या़ त्याची दाखल जिल्हा  परिषदेकडून घेण्यात आली. बोगस प्रमाणपत्रे दाखल केलेल्या शिक्षकांच्या बदल्या रद्द करून त्यांच्या जागी विस्थापित शिक्षकांची नियुक्ती करावी, अशी शिक्षकांची मागणी आहे.

शिक्षकांनी दाखवलेले अंतर सार्वजनिक बांधकाम विभाकडून तपासण्यात येत आहे. तसेच मेडिकल प्रमाणपत्रांची तपासणी करण्यात येत आहे. यात चुकीची माहिती सादर केली असल्यास गंभीर स्वरूपाची कारवाई होणार आहे.
यात कुठल्याही राजकीय दबावाचा परिणाम होणार नाही.
- सुरजप्रसाद जैस्वाल (प्राथमिक शिक्षण अधिकारी)

Web Title: teachers are in complications due to online transfer in gangapur tehsil