दौलताबादला भरधाव मोटारीने चिरडल्याने शिक्षकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 ऑक्टोबर 2018

मित्रांसोबत मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या शिक्षकाचा गुजरात येथून औरंगाबादच्या दिशेने येणाऱ्या भरधाव मोटारीने चिरडल्याने मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (ता.22) सकाळी पाचच्या सुमारास दौलताबाद (ता.औरंगाबाद) येथे घडली.

दौलताबाद : मित्रांसोबत मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या शिक्षकाचा गुजरात येथून औरंगाबादच्या दिशेने येणाऱ्या भरधाव मोटारीने चिरडल्याने मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (ता.22) सकाळी पाचच्या सुमारास दौलताबाद (ता.औरंगाबाद) येथे घडली.

मोटारीचा वेग जास्त असल्याने अपघातानंतर मोटार काही अंतरावर जाऊन उलटली व त्यातील प्रवासी किरकोळ जखमी झाले. मृत शिक्षकाचे भानुदास जनार्दन जाधव (वय 45 रा. दौलताबाद ता. औरंगाबाद) असे नाव आहे.

ते आपल्या काही मित्रांसोबत पहाटे पाचच्या सुमारास मॉर्निंग वॉकला येथील देवगिरी किल्ल्याजवळून जात असताना समोरून येणाऱ्या भरधाव मोटारीने चिरडल्याने त्यांचा मृत्यू झाला व अपघातात कारही उलटली. त्यानंतर बसस्थानक परिसरात असलेल्या ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन कारमधील किरकोळ जखमींना औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल केले. दौलताबाद पोलिसांनी कार ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात जमा केली आहे.

Web Title: Teachers death in Car accident