जुन्या पेन्शन योजनेसाठी शिक्षकांचे धरणे आंदोलन 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 एप्रिल 2017

बीड - नवीन अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, यासह इतर मागण्यांसाठी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने मंगळवारी (ता. 25) बीड तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. 

बीड - नवीन अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, यासह इतर मागण्यांसाठी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने मंगळवारी (ता. 25) बीड तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. 

नवीन अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी, शैक्षणिक प्रश्‍न सोडविण्यासाठी राष्ट्रीय आयोगाची स्थापना करावी, सहाव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करून सातव्या वेतन आयोगातील समान काम समान वेतन या तत्त्वाचा अवलंब शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी करण्यात यावा, सातवा वेतन आयोग लवकर लागू करावा, शिक्षण सेवकपद रद्द करण्यात यावे, बदल्यांचा 2017 चा अन्यायकारक शासनादेश रद्द करून 2014 चा शासनादेश बदल्यांबाबत कायम ठेवण्यात यावा आदी मागण्यांसाठी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, बीड शाखेच्या वतीने मंगळवारी धरणे आंदोलन करण्यात आले. संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील कुर्लेकर, जिल्हा सरचिटणीस धर्मराज मागदे, रमेश नागरगोजे, कविता डोके, सुरेश बहीर, एल. पी. करांडे, रामदास ठोसर, दिलीप मिसाळ, दत्तात्रय कवचट, किशोर जांभळे, बंडू काळे, जयश्री शिंदे, राजीव जाधव, जगन्नाथ जाधव, संतोष कोठेकर, अरुण खरात, सुमंत खांडे, मनोहर ओव्हाळ, कृष्णा सरवदे, उत्तम चव्हाण, मारोती काळे, राजेसाहेब चव्हाण, निळकंठ जिरगे, महारुद्र केकान आदी आंदोलनात सहभागी झाले होते. 

Web Title: Teacher's movement for old pension scheme