पूरग्रस्तांच्या आरोग्यसेवेसाठी पथके रवाना

उस्मानाबाद ः पूरग्रस्तांना आरोग्य सेवा देण्यासाठी दमयंती हरिदास जगदाळे प्रतिष्ठान व दृष्टी उद्योग समूहाच्या वतीने तज्ज्ञ डॉक्‍टरांसह औषधी असलेले चार फिरते आरोग्य केंद्र पाठविण्यात आली आहेत.
उस्मानाबाद ः पूरग्रस्तांना आरोग्य सेवा देण्यासाठी दमयंती हरिदास जगदाळे प्रतिष्ठान व दृष्टी उद्योग समूहाच्या वतीने तज्ज्ञ डॉक्‍टरांसह औषधी असलेले चार फिरते आरोग्य केंद्र पाठविण्यात आली आहेत.

उस्मानाबाद (जि. उस्मानाबाद) : पूरग्रस्तांच्या आरोग्य सेवेसाठी नळदुर्ग (ता. तुळजापूर) येथील दमयंती हरिदास जगदाळे प्रतिष्ठान व दृष्टी उद्योग समूहाच्या वतीने तज्ज्ञ डॉक्‍टर, औषधीसाठा असलेले चार फिरते आरोग्य केंद्रे सोमवारी (ता. 12) उस्मानाबाद येथून कोल्हापूर, सांगली भागांकडे रवाना करण्यात आली.

 
सांगली, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दृष्टी उद्योग समूहाचे अशोक जगदाळे यांनी ही मदत पाठवली आहे. सोमवारी उस्मानाबाद येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी फिरते आरोग्य केंद्र असलेल्या चार वाहनांना हिरवा झेंडा दाखविल्यानंतर ही वाहने कोल्हापूर, सांगलीकडे रवाना झाली. यावेळी अशोक जगदाळे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे, ओक्‍हार्ट हॉस्पिटलचे डॉ. जयकिशन गुप्ता, डॉ. विकास चोबे, डॉ. अनिता राकेश, डॉ. अभिषेक मोरे, अमोल कांबळे, शिवसेनेचे कमलाकर चव्हाण यांची उपस्थिती होती. 


जिल्हाधिकारी मुधोळ-मुंडे म्हणाल्या, की श्री. जगदाळे यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी हात पुढे केला असून, तो कौतुकास्पद आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी दानशूर व्यक्तींनी पुढे यावे. या चार फिरत्या आरोग्य केंद्राच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्‍टरांची चार पथके आठ दिवस पूरग्रस्त भागात फिरून नागरिकांची आरोग्य तपासणी, डेगी, मलेरिया, रक्तदान, मधुमेहासह सर्व साथीच्या आजारांवर तत्काळ तपासणी करून उपचार करणार आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com