
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण कर्मचारी संघटनेतर्फे शुक्रवारी (ता. 22) औरंगाबाद विभागाचे तंत्रशिक्षण सहसंचालक डॉ. महेश शिवणकर यांचा सत्कार करण्यात आला.
औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण कर्मचारी संघटनेतर्फे शुक्रवारी (ता. 22) औरंगाबाद विभागाचे तंत्रशिक्षण सहसंचालक डॉ. महेश शिवणकर यांचा सत्कार करण्यात आला.
विभागाअंतर्गत बदल्यांमध्ये कर्मचाऱ्यांना सोईस्कर बदली करण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. प्रगती योजनेअंतर्गत पात्र कर्मचाऱ्यांना एक महिन्यात लाभ मिळवून दिले जातील. तसेच इतर प्रश्नही आर्थिक वर्षाअखेर निकाली काढण्यात येतील. असे आश्वासन त्यांनी दिले आहे.
तंत्रशिक्षण विभागातील क्रीडा स्पर्धामुळे कर्मचाऱ्यांच्या कला गुणांना वाव मिळाला. यामुळे एकीची भावना निर्माण झाली. शासनामध्ये एकत्रितरित्या सात जणांना अनुकंपा धर्तीवर नियुक्त्या देण्याचा निर्णय यातून कार्यक्षमता, धडाडीची निर्णयक्षमता प्रकर्षाने समोर येते. संघटनेचा कर्मचारी अपघातात मरण पावल्यानंतर त्याचा कुटुंबियावर ओढवलेल्या संकटातून सावरण्यासाठी मदतीसाठी पुढाकार घेतला. यामुळे संघटनेचे राज्य अध्यक्ष सुरेश करपे, राज्य सचिव निलेश भोसले, सुनिल शास्त्री, शेषराव भवर, शेखर कांबळे, श्री. दिवटे, विजय शृंगारे, लक्ष्मण मामडे, श्री. पठाण, श्री. पुरंदरे यांची उपस्थिती होती.