तापमान पुन्हा ओलांडणार चाळिशी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 एप्रिल 2017

औरंगाबाद - यावर्षी मार्च एण्डलाच तापनाने चाळिशी पार केली. त्यामुळे शहरवासीयांना प्रचंड उकाड्याचा त्रास सहन करावा लागला. त्यानंतर गेल्या काही दिवसांत तापमानात घट झाली; मात्र शहरवासीयांना पुन्हा सूर्याच्या प्रकोपाचा त्रास सहन करावा लागण्याची शक्‍यता आहे. आगामी आठवडाभरात पारा 41 अंश सेल्सिअसच्या घरात जाण्याची शक्‍यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

यंदाच्या उन्हाळ्यात सुरवातीलाच सूर्य चांगलाच तापला. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात विक्रमी तापमान नोंदविले गेले होते. औरंगाबाद शहराच्या तापमानात मोठी वाढ होऊन ते 42 अंशांपर्यंत गेले होते; मात्र एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तापमानात घट झाल्याने नागरिकांना हायसे वाटले. आता शहराचा पारा पुन्हा वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविण्यात आला आहे. शहराचा पारा हा 15 एप्रिलपर्यंत 41 अंशांपर्यंत जाऊ शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

नेमकी का वाढणार उष्णता ?
कोरडे वातावरण असल्यामुळे उन्हाचा पारा वाढला आहे. दरम्यान, मराठवाडा आणि कर्नाटकाच्या उत्तर भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. या क्षेत्राचे चक्राकार वाऱ्यामध्ये रूपांतर होण्याची शक्‍यता आहे. परिणामी, वातावरणात दमटपणा तयार झाला आहे. त्यामुळे औरंगाबदचेच नव्हे तर विदर्भ आणि पश्‍चिम महाराष्ट्राच्याही तापमानात वाढ झाली आहे.

आठवडाभरातील तापमानाचा अंदाज (अंशांमध्ये)
दिवस ----------किमान----------कमाल

12 एप्रिल---------20-----------40
13 एप्रिल---------20-----------40
14 एप्रिल---------21-----------40
15 एप्रिल---------21-----------41
16 एप्रिल---------21-----------41
17 एप्रिल---------21-----------41

Web Title: temperature pass to 40%