दुचाकी चोरुन पळवायची अन्‌  पेट्रोल संपताच टाकून द्यायची! 

मनोज साखरे
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

औरंगाबाद - घरासमोर उभी दुचाकी हॅंडल लॉक तोडून चोरायची. फेरफटका मारायचा, हौस भागवायची अन्‌ पेट्रोल संपताच सोडून द्यायची. काही आवडल्या तर घरी घेऊन जायच्या, अशी मोडस वापरुन तरुणांनी नव्हे तर अल्पवयीन तीन मुलांनी तब्बल दहा दुचाकी लांबविल्या. या दुचाकी सिटीचौक पोलिसांनी जप्त केल्या. 

औरंगाबादच्या कबाडीपुरा भागातून एक दुचाकी काही दिवसांपूर्वी चोरी झाली. दुचाकी जिथे उभी केली तेथील सीसीटीव्हीत चोरीचा प्रकार कैद झाला. यानंतर सिटीचौक पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज गोळा केले. चक्क अल्पवयीनाने दुचाकी लांबविल्याचे सीसीटीव्हीत दिसुन आले. त्याआधारे अल्पवयीनाचा शोध पोलिसांनी सुरु केला. बुधवारी ज्युबली पार्क भागातून एकाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले.

चौकशीत या मुलाने तो आधी राहत असलेल्या भागातील दोन अल्पवयीन मुसलांसोबत चोरी केल्याचे सांगितले. यानंतर त्यांनाही पोलिसांनी विचारपुस करण्यासाठी ताब्यात घेतले. या मुलांनी विविध भागातून दुचाकी चोरल्या होत्या. या दुचाकी त्यांनी कोटला कॉलनी, सिध्दार्थ उद्यान, भोईवाडा, छावणी परिसरात लपवून ठेवल्या होत्या.

 तिघांना व्हाईटनरची चटक 
तिन मुले नशापान करीत असल्याची बाब समोर आल्याचे सूत्रांनी सांगितले. ते व्हाईटनरची नशा करीत असून त्यांच्याकडे आणखी चोरीच्या दुचाकी असल्याचा संशय आहे. तिन्ही मुलांना नोटीस देत पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ten bikes stolen by minors